राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सध्याच्या राष्ट्रवादीच्या बंडावर अत्यंत जळजळीत पोस्ट सोशल मिडिया वर करून आपला संताप व्यक्त केला आहे त्यांची कविता विखार ओकत आहे ..फोटोत देखील त्यांनी चारही बाजूंनी कुत्र्यांचे फोटो टाकले आहेत . आणि मध्ये महाराष्ट्राच्या नकाशात मध्यभागी शरद पवारांचा फोटो आहे आणि त्यांच्या बाजूला गर्दी जमलेली आहे. त्यांची कविता त्यांच्याच शब्दात …
आज या दारात… उद्या त्या दारात…
पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल
मग लोकांना काय सांगणार?
तोंड कसं दाखवणार?
काल तर कडवा विरोध होता..
मग आज अचानक गळ्यात गळा कसा?
तो कोणता गळ आहे…
ज्या गळाला लागला मासा!
तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं?
रोजचीच चिखलफेक बघत का बसायचं?
अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार?
किती दिवस आम्ही हेच ऐकायचं?
जगण्याची, विचारांची बदलत चाललीय भाषा..
आता कुणाकडून करायची जनतेने आशा?
भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा..
कोणता पक्ष… कोणता विचार.. अन् कसली निष्ठा..
इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा..
कालची भाषा एक होती… आज भलतंच बरळत आहेत…
स्वार्थासाठी अनेकजण दात खाऊन पळत आहेत.
कुठेय आपला तो सुसंस्कृत महाराष्ट्र… अन् कुठेय परंपरा?
निर्लज्जपणाचा झाला कळस…
तुम्हाला येत नाही याची किळस?
मत ज्यांची घ्यायची… त्यांचीच चेष्टा करायची
ही कोणती रित?
ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली..
ती देशाला विचार देणारी पिढी आज कुठे हरवली?
शिव-शाहू-फुले-आंबेडकर…
तुम्ही महाराष्ट्र घडवला…
तुमच्या पुरोगामी विचारांच रोपटं इथं रुजवलं..
पण आज याच रोपट्यावर होतेय का विखारी पावसाचं सिंचन?
हे होत असेल तर रोखायचं कुणी?
विष पसरवणाऱ्याला थोपवायचं कुणी?
त्यासाठी साहेब….
लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती
आता तुम्हीच उठा…
अन मैदानात उतरा…
शेकडो… हजारो… लाखो… करोडो हात देतील तुम्हाला साथ..
त्यात माझेही असतील दोन हात.
