अजित पवार गटाच्या बैठकीचे निमंत्रण देताना रुपाली चाकणकर यांनी केला शरद पवारांच्या फोटोचा वापर , कार्यकर्ते संभ्रमात

अजितदादांसह ९ मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले. पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर २/३ म्हणजे ३६ आमदार असतील तरच या ९ जणांचा बचाव होईल. अन्यथा फुटीर आमदारांची हकालपट्टी होऊ शकते. त्यामुळे बुधवारी ३६ आमदार जमवण्याचे दादांसमोर आव्हान असेल.तर ८३ वर्षीय योद्धा तुमची वाट पाहतोय.. खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदारांना परत येण्यासाठी असे भावनिक आवाहन केले आहे.
‘आम्हीच खरे राष्ट्रवादी’ असा दावा करणारे शरद पवार व अजित पवार हे काका-पुतणे बुधवारी मुंबईत स्वतंत्र बैठकांद्वारे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. भाजपला पाठिंबा देण्याबाबत ४० आमदारांच्या सह्यांचे आपल्याकडे पत्र आहे. त्यामुळे पक्ष व चिन्ह आमच्याकडेच असा दावा दादा गटाकडून केला जात आहे. तर अनेक आमदार आमच्याकडे परत येत असल्याचा पवार गटाचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पवार गटाची यशवंतराव चव्हाण सभागृहात तर दादा गटाची भुजबळ नॉलेज सिटीत बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी दोन्ही बाजंूच्या प्रतोदांनी व्हीपही बजावला आहे अनेक आमदार रात्रीच मुंबईत आले आहेत. अखेरपर्यंत पळवापळवीचे प्रयत्न सुरू असल्याने त्यांना हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले होते.
अजित पवार गटाने मंगळवारी ‘प्रतापगड’ नावाने नवीन संपर्क कार्यालय सुरू केले. तिथे शरद पवार यांचे फोटो असलेले बोर्ड लावलेत. त्यावर पवार यांनी ठणकावले. ‘ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, ज्यांच्याशी माझे वैचारिक मतभेद आहेत त्यांनी फोटो वापरू नये. जिवंतपणी फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे.दरम्यान अजित पवार गटात गेलेल्या रुपाली चाकणकर यांनी मात्र फेसबुक पोस्ट वर अजित पवार गटाचे निमंत्रण देताना शरद पवार यांचाच फोटो देऊन दिशाभूल चालविली आहे असा आरोप होतो आहे .
रुपाली चाकणकरांनंतर रुपाली पाटील ही अजित पवार गटात …
दरम्यान पुण्यातील आणखी एक आक्रमक महिला कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या माणसे तून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या रुपाली पाटील देखील आता अजित पवार गोटात सामील झाल्या आहेत त्यांनी सोशल मिडिया तून हे स्पष्ट करत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्याबाबतचे फोटो शेअर करत शरद पवार आमचे दैवत नक्कीच पण आम्ही अजित पवारांसोबत असा दावा केला आहे.

शरद पवार विरुद्ध अजित पवार हा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नुकतेच उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांनी आज आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. शरद पवार गटाची दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी एक वाजता, तर अजित पवार गटाची वांद्रे उपनगरातील भुजबळ नॉलेज सिटी येथे सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे.
एकूण 53 आमदारांपैकी ज्या गटात सर्वाधिक आमदार असतील, तोच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा घटनात्मक अधिकार सांगू शकेल. आज बैठकांमधून कोणत्या गटाकडे किती आमदार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार विरुद्ध शरद पवार या लढाईसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्यांना प्रतिज्ञापत्र आणण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी व्हीपही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवार गटाला 42 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले आहे.