Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आता RSS च्या विचारधारे बरोबर जायचे काय ? पुण्यातून अजित पवारांनाच थेट सवाल

Date:

पुण्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीकडे असंख्य नगरसेवकांनी फिरविली पाठ

गेल्या सत्रातील माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मात्र गर्दी

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माजी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराची कार्यकारणी बैठक पार पडली.मात्र या बैठकीकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले तरीही या सत्रातील नसले तरी त्या मागच्या सत्रातील अनेक माजी नगरसेवक , कार्यकर्ते यांनी मात्र गर्दी केली होती .मात्र नुकत्याच संपलेल्या महापालिका पंचवार्षिक सत्रातील अवघे ३ नगरसेवक उपस्थित होते .

आमदार चेतन तुपे , आमदार सुनील टिंगरे हे दोघेही आमदार गैरहजर होते. जे उपस्थित होते ते खडकवासला विधानसभा मतदार संघातील , बारामती लोकसभा मतदार संघातील म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघातील दिपाली धुमाळ,आणि बाळा धनकवडे हे दोघेच नगरसेवक उपस्थित होते तर शहरातील केवळ वनराज आंदेकर उपस्थित होते . या व्यतरिक्त खासदार वंदना चव्हाण शांतीलाल सुरतवाला, अंकुश काकडे,माजी आमदार जयदेव गायकवाड,कमल ढोले पाटील ,निलेश निकम ,अप्पा जाधव ,बापू शेवाळे ,अर्चना कांबळे, काका चव्हाण, रवींद्र माळवदकर, मृणालिनी वाणी,स्वप्निल दुधाने, प्रकाशआप्पा म्हस्के, भगवानराव साळुंखे, प्रदीप गायकवाड उपस्थित होते पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची २३ वी मासिक कार्यकारणी बैठक आज नेहरू आर्ट गॅलरी, घोले रोड शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाली. पहा यावेळी प्रशांत जगताप आणि अंकुश काकडे काय म्हणाले …..

आजच्या या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ३ महत्वपूर्ण ठराव संमत केले,यात प्रामुख्याने खासदार शरद पवारसाहेब हेच पक्षाचे नेतृत्व असल्याचा ठराव पुणे शहर कार्यकारिणीने एकमताने संमत केला. तसेच उद्या होणाऱ्या कार्यकारणीच्या बैठकीसाठी हजारोंच्या संख्येने पदाधिकारी पुणे शहरातून मुंबई येथे जाणार आहेत. प्रदेश कार्यकारणीने पाठवलेल्या आराखड्यानुसार लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयाला पाठवणार आहे.
या या बैठकी प्रसंगी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशाचे लोकनेते खासदार शरदपवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आजवर महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी व औद्योगिक या सर्व क्षेत्रांमध्ये शरद पवार साहेब यांनी आपले भरीव योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आणि या पक्षाचे आम्ही सर्व सामान्य कार्यकर्ते पवार साहेबांच्या छत्रछायेखाली कायम सामाजिक प्रश्नांसाठी लढत आलो आहोत. आज काही मत-भिन्नता असल्याने पक्षातील काही सन्माननीय सदस्यांनी वेगळी वाट निवडली असली तरी ८३ वर्षाच्या या योध्याला सोडून कुठलाही दुसरा विचार करणे आम्हाला शक्य नाही. कालांतराने पक्षातील हे समज-गैरसमज दूर होतील. परंतु आज मात्र आम्ही सर्व आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहोत आणि कायम स्वरूपी राहणार आहोत.
राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार राज्यातील प्रश्न सोडवण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतकरी, नोकरदार, अल्पभूधारक, अल्प उत्पन्न गटातील नागरिक व सर्वसामान्य जनता अनेक अडचणींना सामोरे जात असताना विरोधीपक्ष म्हणून सर्वसामान्य नागरिकांची बाजू मांडण्याची काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे.राज्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विविध आंदोलने करून सातत्याने आवाज उठवत आहे व या पुढेही उठवत राहील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...