मंत्रालयासमोरील ‘प्रतापगड’ हेच ‘राष्ट्रवादी’चे अधिकृत मुख्यालय
मुंबई, दि. 4 : मंत्रालयासमोरील ‘प्रतापगड’ अ-5 हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत मुख्यालय करण्यात आले असून या ‘प्रतापगड’वरुन यापुढे ‘राष्ट्रवादी’ची सर्व सूत्र हलणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्तवाखाली राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यावर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सोईसाठी तसेच पक्षाच्या कार्यालयीन कामकाजासाठी हे उपयुक्त ठरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यायल मंत्रालयाच्या जवळपास असणे आवश्यक होते. राज्याभरातून विविध कामासाठी तसेच पक्षाच्या कामासाठी मुंबईत येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोईचे व्हावे तसेच पक्षाचे दैनंदिन कार्यालयीन कामकाज सुरळीत व योग्य प्रकारे व्हावे यासाठी मंत्रालयासमोरील ‘प्रतापगड’ 5-अ याठिकाणी हे पक्षाचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. तरी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

