शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता. शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातामुळे शाहरुख खान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या नाकावर व चेहऱ्यावर खोल जखमा झाल्या आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले आहे. मात्र त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
31 वर्षांच्या या प्रदीर्घ करिअरमध्ये शाहरुख खान शूटिंगदरम्यान अनेकदा जखमी झाला आहे. 2017 मध्ये रईसच्या शूटिंगदरम्यान त्याच्या गुडघ्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर छोटी शस्त्रक्रिया करावी लागली होती. 2013 मध्ये चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर त्याच्यावर 8 शस्त्रक्रिया झाल्या होत्या. 2009 मध्येही दुखापतीनंतर त्याच्या डाव्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

