पुणे: पुण्यातील गंगा अल्टस आणि गंगाधाम टॅावर्सच्या बांधकाम साईट वरील कामगांरासाठी गोयल गंगा ग्रुपच्यावतीने एक दिवसीय वैद्यकीय शिबीराचे आयोजन केले होते. तारा मोबाईल क्रेचेस आणि FPAI यांच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला होता
या शिबीराचा उद्देश गोयल गंगा ग्रुपसाठी काम करणाऱ्या बांधकाम साइटवरील कामगारांवर उपचार करण्यासाठी होता. कॉर्पोरेशनचे हे मत आहे की कुठल्याही व्यवसायाला कर्मचारी हेच महत्त्वपूर्ण आणि शक्तिशाली करीत असतात, म्हणून कंपनीनेच त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले पाहिजे.हे कर्मचारी बऱ्याच उंचीवर काम करीत असल्यामुळे कामगारांचे आरोग्य आणि रक्तदाब यावर नजर ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. गोयल गंगा ग्रुप दर सहा महिन्यांनी, म्हणजे वर्षातून दोनदा हा उपक्रम आयोजित करतात.
या शिबिरात सल्ला व उपचार देण्यासाठी बालाजी हॉस्पिटल, खराडी येथील प्रमुख तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करण्यात आले होते.
शिबिरात एकूण 137 कामगारांनी सहभाग घेतला होता. या तपासणीमध्ये त्यांचे रक्तदाब, नाडी, ऑक्सिजन संपृक्तता आणि BSL यांचे परीक्षण करण्यात आले. शिबीरात सहभागी झालेल्या प्रत्येक कामगाराची मोफत शारीरिक तपासणी व सामान्य तपासणी, तसेच उपचार व फिजिओथेरपी देखील करण्यात आली.
“अतिशय मनापासून काम करणाऱ्या या कामगारांसाठी शिबीराचे आयोजन करणे हा एक अद्भुत अनुभव होता.मला असे वाटते की त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे”, गोयल गंगा ग्रुपचे सेफ्टी मॅनेजर श्री सचिन पी. गायकवाड यांनी सांगितले.
गोयल गंगा ग्रुप विषयी: पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये कार्यरत असलेल्या गोयल गंगा ग्रुपला उच्च-गुणवत्तेच्या निवासी आणि व्यावसायिक निर्माण तसेच पायाभूत सुविधा प्रकल्प बांधण्याचा उत्तम अनुभव आहे. ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अतुल गोयल यांचा दृष्टीकोन हा ग्राहकांना विलक्षण अनुभव देण्याचा आहे,आणि त्यांनी याद्वारे उद्योगात नवीन प्रतिमान स्थापित केले आहेत. हा ग्रुप चार दशकांचा उत्तुंग अनुभव असलेला रिअल इस्टेट उद्योगातील अग्रगण्य समूह आहे. त्यांना इकॉनॉमिक टाईम्सच्या द बिझनेस लीडरशिप अवॉर्ड्स २०२१ मध्ये “वर्षातील सर्वोत्कृष्ट रिअल इस्टेट कंपनी” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच गोयल गंगा ग्रुपने नागपुरातील सीताबल्डी मेट्रो स्टेशनवर मध्य भारतातील पहिले जागतिक व्यापार केंद्र बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे,आणि महाराष्ट्राला बांधकाम क्षेत्रात एका उत्तुंग उंचीवर नेले आहे.