केजरीवाल म्हणाले, “अडाणी पंतप्रधान…”

Date:

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (दि. १९ मे) दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आपल्याकडच्या दोन हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा बाजारात आणण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजारांची नोट बाजारात आली होती. आरबीआयने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार २०१९ पासून २ हजारांच्या नोटांची छपाई बंद केली आहे.  दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही या निर्णयाची खिल्ली उडवली. “आधी ते म्हणाले, दोन हजारांच्या नोटेमुळे भ्रष्टाचार संपेल. आता म्हणत आहेत, दोन हजारांची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपुष्टात येईल. यासाठी आम्ही म्हणतो की, पंतप्रधान शिकला-सवरलेला असावा. एक अडाणी पंतप्रधानाला कुणीही काहीही सांगते. त्याला काहीही सजमत नाही. मात्र त्रास तर जनतेला सहन करावा लागतो.”, अशा शेलक्या शब्दात केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे पुण्यात भाजपकडून कोणताही जल्लोष होणार नाही – गणेश बिडकर

महापौर निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव! पुणे: पुणे महानगरपालिकेतील...

महाशिवरात्री निमित्त सोमेश्वरवाडी येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन : नगरसेवक सनी निम्हण

पुणे : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर...

स्वच्छ ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी ऍक्सिस बँकेची एमएसएमईसाठी रूफटॉप सोलर फायनान्स योजना

मुंबई, 5 फेब्रुवारी, 2026: भारतातील खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक असलेल्या...

महात्मा गांधी यांची ७८ व्‍या पुण्यतिथी दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने श्रध्दांजली अर्पण.

पुणे-स्व. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८ व्‍या पुण्यतिथी निमित्त...