पुणे-बालचमूंचा सुट्टीतील आनंद द्विगुणीत करण्यासाठी अलबत्या गलबत्या, ढब्बू ढोल रिमोट गोल अशा ५ धमाल बालनाट्यांचा ‘बालनाट्या महोत्सव’ पुण्यात सोमवार, १७ एप्रिल ते शुक्रवार, २१ एप्रिल पर्यंत कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न होत आहे. ‘संवाद’ पुणे आणि ‘कावरे आयस्क्रीम प्रा. लि.’ यांनी याचे आयोजन केले आहे. या बालनाट्य महोत्सवाचे उद्घाटन सोमवार, दि. १७ एप्रिल रोजी दु. १.०० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होणार असून बालसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रख्यात बाल साहित्यकार ल.म. कडू अध्यक्ष आणि कावरे आयस्क्रीम प्रा. लि.चे’ चेअरमन राजूशेठ कावरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या उद्घाटन कार्यक्रमात बालनाट्या संस्कार केंद्र, पुणे, महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे, अद्वैत थिएटर, मुंबई, रंगभाषा, पुणे आणि रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन, पुणे यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. दि. १७ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीत रोज दु. १.०० वाजता होणाऱ्या या बालनाट्य महोत्सवात ‘एकदा काय झालं?’, ‘कवितांच्या गुदगुल्या’, ‘अलबत्या गलबत्या’, ‘minglish मिडियम’ आणि ‘ढब्बू ढोल रिमोट गोल’ ही पाच बालनाट्य सादर होतील. या बालनाट्यांना येणारे बालचमू आणि त्यांचे पालक या सर्वांना कावरे आयस्क्रीम प्रा.लि. तर्फे आयस्क्रीम मोफत देऊन त्यांच्या आनंदात भर घालण्यात येणार आहेत. या महोत्सवासाठी प्रवेशिका मूल्य आहे असे ‘संवाद’ पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन व ‘कावरे आयस्क्रीम प्रा. लि.चे’ चेअरमन राजूशेठ कावरे यांनी सांगितले.