पुणे- मुख्यमंत्र्यांची आणि बाबा बोडके ची भेट कशी झाली आणि पुढे माफी मागून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न कसा झाला हे साऱ्यांना ठावूक असतानाच उरलेल्या फ्लेक्स बद्दल आता आमदार मेधा कुलकर्णी यांनीच …बाबा बोडके प्रकरणात माझा काय संबध ? विनाकारण मला गोवले जात आहे असा ओरडा करीत,’त्या फ्लेक्सवर माझ्या सोबत बोडकेंचा फोटो कसा आला? हे खासदार अमर साबळे यांनाच विचारा असा पवित्रा घेतल्याने आता सर्वांच्या नजरा खासदार साबळे यांच्याकडे वळल्या आहेत .
पहा हाच तो फ्लेक्स
या कार्यक्रमाचे आयोजक जे होते त्या निलेश निम्हण यांचा भाजपा प्रवेशच खासदार साबळे यांच्यामार्फत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे . याशिवाय या फ्लेक्स वर बाबा बोडकेचा फोटो टाकला जाईल अशी माहिती देखील मला देण्यात आली नव्हती असा दावा हि त्यांनी केला आहे