पुणे- द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबज डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ रिजन ५ व विश्रामबाग वाहतूक पोलिस विभाग परिमंडळ १ च्या संयुक्त विद्यमाने वाढत्या वाहनांच्या समस्यांवर जनजागृती व वाहतूक सुरक्षा विषयी जनजागृती कार्यक्रम अलका टॉकीज चौकात करण्यात आला .यावेळी यमराजाच्या वेशातील कलाकारांकडून वाहनचालकांना सावध रहा , आवर वेगाला , नियमबाह्य कृतींना आणि सावरा जीवाला असे संदेश देण्यात आले .
यावेळी लायन्स क्लबच्या सदस्यांनी हातामध्ये वाहतूक जनजागृतीपर संदेशाचे फलक धरून वाहतूक नियमनाविषयी जनजागृती केली . हेल्मेट घालण्याचे फायदे व अपघातापासून सुरक्षित राहण्यासाठी दुचाकी वाहनचालकांना प्रत्यक्षात यमराज व चित्रगुप्त यांच्या वेशभूषेत असलेल्या कलाकारांनी हेल्मेटधारकांना कॅडबरीचे वाटप करण्यात आले .
आवरा वेगाला , सावरा जीवाला , वाहनचालविताना मोबाइलवर बोलू नका , यमराजासोबत जाण्याची घाई करू नका , रस्त्याचा आदर करा , दारू पियुन वाहन चालवू नका , मत करो इतनी मस्ती जिंदगी नही हे सस्ती , आपली सुरक्षा हीच आपल्या परिवाराची सुरक्षा आदी जनजागृतीपर संदेश देण्यात आले . तसेच , वाहतूक पोलीस कर्मचारी बांधवाना मास्क वाटप करण्यात आले . चारचाकी वाहनचालकांना सीट बेल्टचे महत्व सांगण्यात आले . पी एम पी एलच्या बसचालकांना व अन्य वाहनांना सुध्दा स्टॉप लाईन अगोदर थांबण्याची विनंती करण्यात आली . यावेळी विजय सारडा ,अभय शास्त्री , परमानंद शर्मा , सुमित देसर्डा , विनोद जैन , सचिन धोका , नितीन खोंड , इंद्रजित डोंगरे ,शशांक माळवदे व लायन राहुल खैरे आदींनी विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रमास ३०० आदिवासी बांधव उपस्थित होते .
यावेळी संभाजी पोलिस चौकीचे वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील , विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वाहतूक विभागाचे परिमंडळ एकच्या सहाय्यक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले .