पुणे-यंग भोर्डे आळी मित्र मंडळ आयोजित नवरात्र महोत्सव कार्यक्रमात कारगिल युद्धात शहिद झालेल्या पुणे जिल्ह्यातील हुतात्मा विजय मोरे व प्रदीप मोरे यांच्या वीरपत्नींचा प्रत्येकी 25 हजार रूपयांचा धनादेश , साडी , शाल , श्रीफळ व मातेची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी यंग भोर्डे आळी मित्र मंडळ नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष अध्यक्ष अजय भोसले , सौ. भोसले , आमदार जगदीश मुळीक , माजी आमदार महादेव बाबर , नगरसेवक विशाल धनवडे , नगरसेवक अविनाश बागवे , नगरसेवक प्रदिप गायकवाड , माजी नगरसेवक प्रशांत बधे , डॉ. कुणाल कामठे , गजानन पंडित आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते . त्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त करताना वीरपत्नी दिपाली मोरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ठाणे महापालिकेत नोकरी मिळवून दिल्या बद्दल आभार मानले.