समुपदेशक केंद्र आणि महिला तक्रार निवारण केंद्रातील अधिकारी व सदस्य यांचे सक्षमीकरण यांचे तीन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन

Date:

पुणे-चेतना महिला विकास केंद्र आणि महिला व महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समुपदेशक केंद्र आणि महिला तक्रार निवारण केंद्रातील अधिकारी व सदस्य यांचे सक्षमीकरण यांचे तीन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .

 रास्ता पेठमधील क्वार्टर गेटजवळील वाय. एम. सी. ए. मंधील सभागृहात हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . या कार्यशाळेचे उदघाटन हंस सायडल स्टिफटूग संस्थेचे प्रतिनिधी व्होल्कर लेनार्ट  व प्रकल्प अधिकारी रितू प्रिया यांच्याहस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आले . या कार्यशाळेचे आयोजन चेतना महिला विकास केंद्राच्या संचालिका ऍड. असुंता पारधे यांनी केले होते .

या कार्यशाळेत मुस्लिम वैयक्तिक कायदा या विषयावर ऍड. अहमदखान पठाण यांनी  मार्गदर्शन केले . कार्यशाळेचा उद्देश व पार्शवभूमी तसेच सहभागी प्रशिक्षनार्थी भूमिका व जबाबदारी या विषयावर संदीप महाजन यांनी मार्गदर्शन केले . ख्रिश्चन वैयक्तिक कायदा या विषयावर ऍड. फ्रॅंक अल्वारीस यांनी मार्गदर्शन केले . त्यानंतर दिवाणी प्रक्रिया संहिता या विषयावर ऍड. बाळासाहेब गोगावले यांनी मार्गदर्शन केले . हिंदू विवाह कायदा या विषयावर ऍड. रेखा कोरटकर यांनी मार्गदर्शन केले . विशेष विवाह नोंदणी कायदा या विषयावर ऍड. मेघा भालेराव यांनी मार्गदर्शन केले . हिंदू विवाह कायदा या विषयावर ऍड. सुरेखा वाडकर यांनी मार्गदर्शन केले . हिंदू विवाह कायदा या विषयावर ऍड. प्रफुल्ल पोतदार यांनी मार्गदर्शन केले .

भारतीय दंड संहिता या विषयावर ऍड. शरद पाटील यांनी मार्गदर्शन केले . तर लिंगभाव वर ऍड. अलका जोशीं यांनी मार्गदर्शन केले .महिला व बाल यांवरील हिंसेसंदर्भात आरोग्य अधिकारी यांची भूमिका व जबाबदाऱ्या या विषयावर डॉ. वैशाली जाधव यांनी मार्गदर्शन केले .

यावेळी चेतना महिला विकास केंद्राच्या संचालिका ऍड. असुंता पारधे यांनी सांगितले कि , महिलांविषयी असलेले कायदे व फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे.  सन २००५ पासून स्त्रीयासाठी अनेक कायदे आले . त्यामुळे त्यांना संरक्षण मिळू शकेल परंतु कायद्यांच्या अनेक दुरुस्त्या होऊन सुध्दा त्यांच्याबाबत सर्व सामान्य महिलांमध्ये जागृती नाही . तससह मदत करणाऱ्यांना सरकारी यंत्रणा कायद्याची हाताळणी जबाबदारीने करीत नाहीत . त्यामुळे महिलावरील होणारे अत्याचाराचे प्रकार वाढलेले दिसतात . अशा परिस्थितीत सरकारी अधिकारी व सरकारनेच नेमलेल्या विविध समित्यामधील अधिकारी व कार्यकर्ते यांनी पीडित व्यक्तींना मदत करून स्त्रियांवरील अत्याचार कमी करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेला कायद्यांचा योग्य वापर केला पाहिजे . यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . यामध्ये पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे अधिकारी , पोलीस , विधी प्राधिकरण आदी ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सदस्यांच्या कायद्यातील तरतुदींची माहिती होऊन त्यांना त्यांचा योग्य वापर करावा . म्हणून हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदींची 8 आखाती देशांशी चर्चा, दुबई आणि अबू धाबीहून 2000+ भारतीय परतले

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी भारतीय समुदायाच्या लोकांच्या सुरक्षेबाबत...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन इराणशी चर्चा करणार:मध्य पूर्वेतील देशांवरील हल्ले रोखणे हे उद्दिष्ट

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन इराणशी चर्चा करणार आहेत. मंगळवारी...

२८ आणि २९ मार्चला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

चौथ्या विजेतेपदासाठी भाग्यश्री फंड उत्सुक ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक...

चंद्रकांतदादा पाटील यांची सीआयएसएफच्या जवानांसोबत होळी साजरी

जवानांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मन समाधानाने भरुन आले-...