Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लष्कर भागात मदर मेरीचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

Date:

पुणे-मदर मेरी जन्मोत्सवानिमित्त पुणे कॅम्प भागातील शरबतवाला चौकाजवळील दस्तूर मेहेर रोडवरील नवनिर्माण मंडळाच्यावतीने मदर मेरी यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली . हि मिरवणूक दस्तूर मेहेर रोड , बुटी स्ट्रीट , पारशी अग्यारी , साचापीर स्ट्रीट , शरबतवाला चौक या मार्गावरून काढण्यात आली . सर्व धर्म समभाव या पध्दतीने नवनिर्माण मंडळाच्यावतीने गणेशोत्सव , ईद आणि मदर मेरी जन्मोत्सव असे सर्व धार्मिक सण उत्सव आम्ही सर्व धर्मीय लोक एकत्रित येऊन साजरा करतो . अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष जेम्स यांनी दिली . या जन्मोत्सवासाठी रे फर्नाडिस , परेश गायकवाड , स्टेव्हली फ्रान्सिस , उमेश फडतरे , रुपेश बांदोडकर , शब्बीर राईटर , हुसेनी राईटर , इम्रान सरकार आदींनी विशेष परिश्रम घेतले .

सोलापूर बाजारमध्ये अवर लेडी ऑफ गॉड हेल्थच्यावतीने मदर मेरीच्या प्रतिमेची फुलांची सजावट केली होती . दरवर्षी प्रमाणे मोठ्या संख्येने मदर मेरीच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती , अशी माहिती विजय अँथोनी यांनी दिली . या धार्मिक कार्यक्रमासाठी रॉबिन मदाजोरम , अजय वाघमारे , विजय राजगुरू , ऑगस्टीन सायमन  मेलसीन दास , राजू रिठे , अलशेस प्रगासम , विशाल गायकवाड , डॉनेल्ड डॅनियम आदींनी विशेष परिश्रम घेतले .

घोरपडी बाजार येथे अवे  मेरी ख्रिश्चन यंग बॉयजच्यावतीने   मदर मेरीच्या प्रतिमेची विद्युत रोषणाईच्या बग्गीमध्ये सजावट करून फेरी काढण्यात आली .  अवे  मेरी ख्रिश्चन यंग बॉयजच्या जॅक्सन अँथोनी , निवास लादे , डॉमनिक अँथोनी , ऑलॉन अंब्रोस , सेल्वराज मुदलियार , अमित जाधव , कनय्या अँथोनी , ट्रेवोर अँथोनी आदींनी विशेष परिश्रम घेतले . सेंट जोसेफ चर्च , घोरपडी बाजार , फिलिप्स चाळ , तालीम चौक , रेल्वे कॉलनी , आगवाली चाळ आदी भागात मिरवणूक काढण्यात आली .

वानवडी बाजारमधील मदर मेरीच्या प्रतिमेभोवती भव्य विद्युत रोषणाईचा देखावा सादर केला होता . यावेळी मदर मेरीची प्रतिमेची मिरवणूक वानवडी बाजारमधील चर्चमधून गिरमे शाळा , महादजी शिंदे शाळा , वानवडी बाजार पोलीस चौकी ,वानवडी बाजारमधून काढण्यात आली . यामध्ये फादर विल्फ़्रिड डिसोझा , टोनी बर्नाट , मनी पॉल , मॅथ्यू परेरा , सचिन मथुरावाला , विनोद मोगरे , सुरज लाळगे , हमीद शेख राजू ऑगस्टीन सेल्वराज , आरोके स्वामी सहभागी झाले होते . यावेळी केक वाटप करण्यात आले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...