पुणे -लष्कर भागातील सोलापूर रोडवरील बंगला नंबर एकमधील पाचपीर दर्गाह मैदानमधील हजरत सय्यद मोहम्मद शाह रहे दर्गाहचा ४३९ वा उरूस उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी घूसूल , कुराणख्वानी , समाखानी आदी धार्मिक कार्यक्रम झाले . त्यानंतर लंगरचा कार्यक्रम झाला . यावेळी हजरत सय्यद मोहम्मद शाह रहे दर्गाहचे प्रमुख खादिम जयकुमार राघवाचारी , योगेश चव्हाण , माजी महापौर नगरसेवक प्रशांत जगताप ,मौलाना इकबाल आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी मुंबईमधील प्रसिध्द कव्वाल मंजूर जानी यांचा कव्वालीचा कार्यक्रम झाला .त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त कविराज संघेलिया , शशिकांत म्हेत्रे , शशिधर पुरम , सुरेश आगुरेड्डी , चंद्रकांत मुलतानी , श्रीराम चौधरी आदींचा सन्मानचिन्ह , शाल व पुष्पगुछ देउन माजी महापौर नगरसेवक प्रशांत जगताप यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले .
या उरुसाचे आयोजनासाठी हजरत सय्यद मोहम्मद शाह रहे दर्गाहचे प्रमुख खादिम जयकुमार राघवाचारी , योगेश चव्हाण , सोमेश खरात , विजयन जोसेफ , गणेश राघवाचारी , सूरज राघवाचारी , राहुल खरात , नासिर शेख , मनोहर पिल्ले , अमर पुणेकर , आरिफ शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले .

