पुणे-भारतरत्न – नोबेल विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांच्या जयंतीनिमित्त मायनॉरिटी एज्यकेशनल व सोशल ट्रस्टच्यावतीने गुरुवार पेठमधील सेंट जॉन वृद्धाश्रमातील महिलांना पुणे धर्मप्रतांचे बिशप थॉमस डाबरे यांच्याहस्ते अन्नदान व बिस्किटाचे वाटप करण्यात आले . या कार्य्रक्रमाचे संयोजन एडविन रॉबर्ट्स यांनी केले होते . यावेळी नगरसेवक रविंद्र धंगेकर , एडविन रॉबर्ट्स , बेंजामिन डिसोझा , फ्रँकी मँडोसा , पीटर डिक्रूज , जॉन सलढाणा , पीटर डिसोझा , बाबू सोनी , निवेदिता रॉबर्ट्स व सेंट जॉन वृद्धाश्रमाच्या प्रशासकीय अधिकारी सुजन कदम आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी पुणे धर्मप्रतांचे बिशप थॉमस डाबरे यांनी सांगितले कि , मदर तेरेसा यांनी दीनदुबळ्या अनाथ बांधवांची सेवा केली . समाजामध्ये या बांधवाना स्थान निर्माण केले . सामाजिक व नैतिक अधिकार त्यांना मिळवून दिले . त्यांनी संपूर्ण जीवन अनाथांना मदत केली . त्यांचा समाजसेवेचा वारसा आपण चालवू हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे सांगितले .
यावेळी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी सांगितले कि , मदर तेरेसा यांच्या जयंतीनिमित्त वृद्धाश्रमात अनाथ महिलांना अन्नदान करून समाजपयोगी उप्रक्रम असून प्रत्येकाने वाढदिवस हे वृद्धाश्रमात जाऊन साजरे केले पाहिजे . मदर तेरेसा यांच्या कार्याचा वारसा आपण सामाजिक उपक्रमांनी चालवू या .
यावेळी पुणे धर्मप्रतांचे बिशप थॉमस डाबरे यांनी सर्वासाठी प्राथर्ना केली .

