पुणे-दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने पुणे शहर व जिल्ह्यामधील ३५ शाळेमधील अडीच हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवा निवृत्त शिक्षकांचा सत्कार नगरसेवक रफिक शेख यांच्याहस्ते करण्यात आले .
भवानी पेठमधील गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टचे अध्यक्ष शाहिद इनामदार , दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , बंधू भाव भाईचारा संघटनेचे अध्यक्ष शब्बीर शेख , मुस्लिम को ऑप. बँक संचालक एस. ए. इनामदार व विद्यानिकेतन एजुकेशन ट्रस्ट सिमा फरीद तुंगेकर उपस्थित होते .
या कार्यक्रमात सेवा निवृत्त शिक्षकांचा शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देउन सत्कार करण्यात आला . पुणे शहरामधील उर्दू माध्यमातील शाळांमधील दहावीमधील शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व भेटवस्तू सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टचे अध्यक्ष शाहिद इनामदार यांनी सांगितले कि , दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने कौतुकास्पद असून पुढील वर्षी प्रमाणे मुलांना माहिती तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी लॅपटॉप आणि आयपॉड गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त होत असल्याने त्यांचे व पालकांचे कौतुक केले . मागील वीस वर्षांपासून दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे . सोसायटीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे .
नगरसेवक रफिक शेख यांनी दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी भविष्यकाळात मदत करण्याचे आश्वासन दिले . गरजू होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येईल , पुणे महापालिकेकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले .
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी यांनी केले तर सूत्रसंचालन अहमद बागवान यांनी केले तर आभार मोहंमद मुतलिब मोहम्मद मुख्तार यांनी मानले .
या कार्यक्रमास हाजी गुलाम एजुकेशन ट्रस्टचे शाहिद मुनीर शेख , अब्दुल वहाब (पार्टी), आफिया मोहमदअली , अब्दुल सत्तार , खान फिरोज गुलशेर, मतीन शेख , अमीन शेख , व समाजातील अन्य मान्यवर , मुख्याध्यापक , पालक आणि शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते