पुणे-महामानव संघटना आयोजित आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आमदार चषक २०१८ ताडीवाला रोड येथील जय माता दी संघाने जिंकला . ताडीवाला रोड येथील रेल्वे पोलिस मैदानावर पुणे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या . या क्रिकेट स्पर्धेमध्ये ३२ संघानी भाग घेतला . या क्रिकेट स्पर्धेमधील अंतिम क्रिकेटचा सामना ताडीवाला रोड येथील जय माता दि संघ व कोथरूड येथील मृत्युंजय संघामध्ये झाला . यामध्ये जय माता दी संघ विजयी ठरला .
या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड यांच्याहस्ते पार पडला . विजेत्या संघास ३३३३३ रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील , माजी आमदार कमल ढोलेपाटील , नगरसेवक प्रदीप गायकवाड , नगरसेवक प्रशांत जगताप ,नगरसेवक अशोक कांबळे , माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर , आरिफ बागवान , प्रा. मयूर गायकवाड ,ऋषी परदेशी , अशोक राठी , पंडित कांबळे , भोलासिंग अरोरा , जनार्दन जगताप , ऍड. प्रविण डाळिंबे , संतोष गायकवाड , अतिश वाघमारे , मुनीर सय्यद , तुकाराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .
या क्रिकेट स्पर्धेसाठी महामानव संघटनेचे अध्यक्ष संतोष थरकार , भीमसेन जमादार , प्रीतम भोसले , धनंजय कांबळे , रमेश रामोशी , ऋतिक सुडगे , अजय कांबळे , भगवान नायकवडे , हर्षद कांबळे , सनी चव्हाण , मल्लेश बेलदरे , अर्जुन जमादार , निलेश भिंगारे , नागेश कांबळे , राजेश सुडगे व अमित काकडे आदींनी विशेष परिश्रम घेतले .
यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमात सर्वांचे स्वागत प्रा. मयूर गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन जर्नादन जगताप व हरिष काकडे यांनी केले तर आभार आनंद सवाणे यांनी मानले .

