पुणे-ललित कला साहित्य मंचच्यावतीने ७२ कवीं व लेखकांचे साहित्य असलेले ” साहित्यगंध ” पुस्तकाचे प्रकाशन साहित्यिक राहुल भोसले यांच्याहस्ते करण्यात आले . नऱ्हे – आंबेगावमधील ललित कला साहित्य मंचच्या सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास साहित्यिक दिनेश खैरे , साहित्यगंधचे संपादक ललित कोलते , उपसंपादक अमोल झोपे , सहसंपादक ह. भ. प. कलावती सुर्वे , प्रियांका कोलते आदी मान्यवर उपस्थित होते .
सर्वभाषिक साहित्यिकाकरिता त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी व्यासपीठ मिळावे याकरिता तरुणांनी एकत्रित येऊन ललित कला साहित्य मंचची स्थापना करण्यात आली आहे . यामध्ये सर्व भाषिकांना प्राधान्य देण्यात आले आहे . जनमाणसातील माणसासाठी साहित्यातील अनमोल शोधासाठी प्रत्येक भाषेतील भाषिकांसाठी फुलपाखरासम करून छद उदयास आला. ” साहित्यगंध ” या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे या पुस्तकात कथा , कविता , लेख , चारोळी , हायकू , गझल , शायरी आदीं साहित्याचा समावेश असून भाषा व मर्यादा यास बंधन नाही . साहत्यिकांना सर्व भाषेतील साहित्य त्यांच्या इच्छेप्रमाणे विनामूल्य ” साहित्यगंध ” या पुस्तकात साहित्य प्रकाशित करण्यात आले आहेत . यामधील सर्व साहित्यिकांना हे पुस्तक मोफत देण्यात आले . या पुस्तकाची प्रस्तावना नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पी. विठ्ठल यांनी लिहली आहे . साहित्यगंध असे ललित कला साहित्य मंचचे अध्यक्ष व ” साहित्यगंध ” पुस्तकाचे संपादक ललित कोलते यांनी सांगितले .
नवोदित कवी लेखकांना या पुस्तकामधून साहित्य प्रकाशित केले असून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले . त्यामुळे ललित कला साहित्य मंच साहत्यिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवित आहे . असे साहित्यिक राहुल भोसले यांनी सांगितले .
या कार्यक्रमाचे प्रास्तविक हरिचंद्र धिवार यांनी केले तर सूत्रसंचालन दुहिता खडके यांनी तर आभार दिनेश खैरे यांनी मानले .

