५ हजार झाडे लावण्याचा शुभारंभ एमआयटी एटीडी व युवराज मित्रमंडळाच्या वतीने वृक्षारोपण
पुणे : कोथरुड येथील युवराज मित्रमंडळ व एमआयटी एटीडीच्या वतीने एमआयटी एटीडीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांच्या गौरवार्थ व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मिटकॉमच्या प्रा. सौ. सुनिता मंगेश कराड यांच्या हस्ते बावधन (खुर्द) येथे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन युवराज मित्रमंडळाचे संस्थापक रोहिदास दिघे यांनी केले होते.
यावेळी पुणे महनगरपालिकेच्या सभासद अल्पना गणेश वरपे, स्थानिक नगरसेविका श्रद्धा प्रभुणे – पाठक, युवराज महिला संस्थेच्या संगिता जगताप, ओम रेकी फॅमिली ट्रस्टच्या सरचिटणीस अनिता पाटकर, तिरंगा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सुहास काकडे, नितीन बोराडे, युवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष भानुदास कांबळे, प्रसाद पाटील, महेंद्र कांबळे, योगेश दिघे, गणेश वरपे, अॅड. बाळासाहेब पावडे, अशोक प्रभुणे, नितीन बोराडे, रामनदी सोसायटीचे सभासद अजित दाणी, ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.
प्रा. सौ. सुनिता मंगेश कराड म्हणाल्या, “ वृक्षारोपणाची मोहीम ही पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या दिशेने आज पाऊल टाकले जात आहे, ही आनंदाची बाब आहे. यापासून सर्वसामान्य जनता प्रेरणा घेईल व एकंदरीत निसर्गाचा समतोल सांभाळला जाईल. प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांच्या गौरवार्थ व गुरुपौर्णिमे निमित्त ५ हजार झाडे लावून त्याचे संगोपन युवराज मित्र मंडळ व एमआयटी एटीडी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पुणे शहरात विविध ठिकाणी करण्यात येणार आहे.” यावेळी उपस्थितांचा प्रा. सौ. सुनिता कराड यांच्या हस्ते मोगरा व गुलाबाची रोपे देऊन सन्मान करण्यात आला.