पुणे: ‘ काशी-रामेश्वर म्हटल कोणाही व्यक्तीला उत्तरेतील रामेश्वरम आणि दक्षिणेतील काशीची आठवण येते. मात्र आता काशी आणि रामेश्वरचे दर्शन घ्यायचे असेल तर दक्षिणेत किंवा उत्तरेत जाण्याची गरज नाही तर ते पुण्य लातूरमधील रामेश्वर (रुई) ला आल्यास मिळेल. ’ अशा भावना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केल्या.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारततर्फे लातूर जिल्ह्यातील रामेश्वर (रूई) येथ्लृे उभारण्यात आलेल्या व दया, क्षमा, शांती, करुणा आणि मानवतेचा संदेश देणार्या ‘तथ् भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती विश्वशांती भवना’ च्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या समारंभासाठी जम्मू-काश्मीर विधान परिषदेचे उपसभापती श्री. जहांगीर हुसेन मीर, अयोध्या येथ्लृील रामजन्मभूमी न्यासाचे कार्याध्यक्ष डॉ.राम विलास वेदांती हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थ्लिृत होते.
लातूर चे खासदार सुनील गायकवाड, सांची विश्वविद्यालयाचे कुलपतीआचार्य डॉ. यज्ञेश्वर एस.शास्त्री, महान तत्वचिंतक आणि साधक महंत रामदास, नांदेड येथ्लृील पूर्णा बुद्ध विहार चे प्रमुख महाथ्लृेरो भंते उपगुप्त, आणि माजी खासदार गोेपाळराव पाटील विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थ्लिृत होते.
तसेच, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थ्लृापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ् दा. कराड, रामेश्वर (रूई) चे माजी सरपंच तुळशीराम दा.कराड, प्रगतीशील शेतकरी तुलशीराम दा. कराड, माईर्स एमआयटी चे उपाध्यक्ष प्रा.राहुल विश्वनाथ् कराड, माईर्स एमआयटीचे सचिव डॉ.मंगेश तु. कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महविद्यालयाचे कार्यकारी संचालक प्रा.रमेश कराड, ज्येष्ठ साहित्यिक व बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक प्रा.रतनलाल सोनग्रा आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, श्री.श्रीकांत देशमुख, पं. वसंतराव गाडगीळ व हनुमंत गजधने हे उपस्थित होते.
श्री. सुशील कुमार शिंदे म्हणाले, काश्मीर आपल्या देशाचा अविभाज्य भाग असून भारत सरकारने काश्मीरी जनतेशी संवाद साधून त्यांचे म्हणणे एकून घेणे नितांत गरजेचे आहे. सर्व भारतीयांची समजुतीची भूमिका यात अत्यंत महत्वाची आहे. ही भूमिका जर अशीच सोबत असेल तर नक्कीच कश्मीरी जनतेच्या समस्येचे योग्य निदान होउ शकते. आज ज्याप्रकारे आपला भारतीय समाज जात, धर्म, पंथाच्या नावाने विखुरला आहे त्या सामाजाला एकत्र आणण्याचे काम या बुद्ध विहारच्या माध्यमातून डॉ. विश्वनाथ्लृ कराड यांनी केलेले आहे. त्यामुळेच नक्कीच त्यांचे नाव इतिहासात कोरले जाईल. डॉ. कराड हे प्रार्थ्लृनेच्या माध्यमातून आध्यात्म शिकवितात तर प्रा. राहुल कराड छात्र संसदेच्या माध्यमातून संसदेत कशा पद्धतीने कामे करावीत ते सांगतात. वारकरी हा सर्व काही देणारा सांप्रदाय म्हणून ओळखला जातो. त्या वारकरी संप्रदायाचा वारसा डॉ. कराड चालवित आहेत. रामेश्वर येथ्लृे निर्माण केलेले हे बुद्ध भवन हे कुणा ठराविक जातीचे नसून येथ्लृे येउन एक नवा बुद्ध निर्माण व्हावा यासाठी हा विहार निर्मिला गेला आहे.
डॉ. रामविलास वेदांती म्हणाले, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमामुळे देशातच नाही तर संपूर्ण जगात शांतीचा संदेश दिला जात आहे. तसेच श्रीराम-रहीम मानवता सेतूमुळे तर संपूर्ण समाजाल जोडण्याचे अनोखे कार्य संपन्न झाले आहे. धर्माच्या नावाखाली अहिंसारूपी प्रकार बुद्धाच्या काळात सुरू होता त्यातून संपूर्ण समाजाला बाहेर काढण्याचे मानवतेचा संदेश देण्याचे काम गौतम बुद्धांनी केले आहे. गौतम बुद्धांचे तेच कार्य आज रामेश्वरच्या विश्वशांती भवनाच्या माध्यमातून होताना दिसत आहे. आज या पावन दिवशी प्रत्येक व्यक्तीने संकल्प करून देशातील अशांती दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्या रामेश्वरमध्ये केवळ भगवान शंकराचे दर्शन होते मात्र येथ्लृे सर्वच धर्मांची प्रार्थ्लृनास्थ्लृळे पाहायल मिळतात. त्यामुळे या रामेश्वरास रामेश्वर धाम म्हटले जावे, अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली.
प्रा. रतनलाल सोनाग्रा म्हणाले, संतापासून ते शास्त्रज्ञांपर्यंत प्रत्येकाने मानवाचे दु:ख दूर सरण्याचे प्रयत्न केले. त्यातही आध्यात्मामध्ये तर दू:ख निवारण करुन मानवास शांती व सामाधान प्राप्त करुन देण्याचे अनोखे सामर्थ्य आहे. त्याचाच प्रत्यय आज या बुद्ध विहार लोकार्पणाच्या दिवशी येत आहे.
महाथ्लृेरो भंते उपगुप्त म्हणाले, सर्व धर्म समभाव जपण्याचे खरे कार्य लातूर ये सूरू झाले. त्याचा पायाही इथ्लृेच टाकला गेला आणि आता त्याचा कळस रामेश्वर येथ्लृे बनला गेला. बुद्धाचे तत्वज्ञान हे प्रेमाचे आणि जीवदान देणारे आहे, जीव घेणारे नाही. काही माणसे मृत्यूनंतरही आपल्या कार्य व कर्तृत्वाने जिवंत राहतात तर काही जिवंतपणीही नसल्यासारखीच असतात.
खासदार सुनिल गायकवाड म्हणाले, बुद्ध हा विचारातून व कृतीमधून साकार होतो. आज डॉ. विश्वनाथ्लृ कराड यांच्या मध्ये मला बुद्ध प्रतित होतो आहे. या सोबतच खा. गायकवाड यांनी यावेळी सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी रामेश्वर या गावाची निवड केल्याची घोषण्आ देखील क्वेली.
डॉ.विश्वनाथ्लृ कराड म्हणाले, विज्ञान व आध्यात्मामधून स्वामी विवेकानंदानी विश्वशांतीचा मार्ग सांगितला. तोच मार्ग संत ज्ञानेश्वरांपासून ते अल्बर्ट आइन्स्टाईन ने सांगितला आहे. सर्व विकार दूर करण्याचे शास्त्र म्हणजे आध्यात्म आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महामानव म्हटले जाते. कारण त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास हा अत्यंत संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायी देखिल होता. भारतीय संस्कृती व परंपरेमध्येच त्याग व समर्पणाचे चिंतन केले आहे. आजही आपला भारत देश गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या नावानेच संपूर्ण जगामध्ये ओळखला जातो.
ना. श्री. जहांगीर हुसेन मीर म्हणाले, खरे पाहता कोणतेही धर्मस्थ्लृल जसे मंदीर, मशीद, गुरुद्वारा हे वादाचे ठिकाण नसतात तर ते तिथ्लृे येणारा प्रत्येक जण्अ परमेश्वरापाशी लीन होण्यासाठी येते अस्तो. आजही आपल्या देशात सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा असे म्ह्टले जाते. जो भाईचारा आज आपल्या देशामध्ये पाहयला मिळतो. तो इतरत्र कोठही दिसत नाही.
या सोबतच यावेळी महंत रामदास निर्मोही, डॉ. यज्ञेश शास्त्री, माजी खासदार श्री. गोपाळराव पाटील आदी मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले.
बुद्ध विहार निर्माण करण्यार्या अभियंता तसेच सर्व कामगारांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला गेला.
प्रा. रतनलाल सोनाग्रा लिखित मैत्रेय बुद्ध या ग्रंथ्लृाचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
डॉ. एस.एन. पठाण यांनी प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.


