डॉ. आंबेडकर देशाचे पंतप्रधान झाले असते : पदमश्री डी.वाय.पाटील
आचार्य सोनाग्रा यांच्या मैत्रेयबुद्ध महाग्रंथाच्या लोकार्पण समारंभ
पुणे : घटनाशिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचे महानायक होते. माझा त्यांच्याशी जवळील संबंध होता. मला असे वाटते की त्यांनी जर राजीनाम दिला नसता तर ते भारताचे पंतप्रधान झाले असते. असे विचार पदमश्री डी.वाय.पाटील यांनी व्यक्त केले.
आचार्य रतनलाल सोनग्रा लिखित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैत्रेय बुदध या महाग्रंथाचा लोकार्पण सोहळा पदमश्री डी.वाय.पाटील यांच्या हस्ते पुष्पलता या प्रासादात पार पडला. यावेळेस आरती सोनग्रा यांनी डी.वाय.पाटील यांचा सत्कार केला. तसेच बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे यांचा सत्कार डॉ.विकास आबनावे यांनी केला. या महाग्रंथाचे मुद्रक आनंद लाटकर यांचा सन्मान प्रेमसुख सोनग्रा यांच्या हस्ते करण्यात आला.
आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी आपल्या भाषणात गेली 60 वर्षे विश्वरत्न डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाचा अभ्यास करताना तथगताने सांगितले. आगामी मैत्रेय बुदधाची प्रतिमा डॉ. आंबेडकरांच्या जीवनात परिपूर्ण साकार झालेली आहे. बोधिसत्वाकडून बुदधलाकडे जाणार्या सर्व पारमिता ( सर्वोच्च गुण) त्यांनी पालन केले आहेत. लाखों अनुयायांना एकाच वेळी धम्मदान देऊन त्यांची बुदधत्वाची उदघोषणा केली..
राजेश ढाबरे यांनी आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे अभिनंदन केले. तसेच प्रत्येक मानव बोधिचित्त होऊन बुध्दव प्राप्त करू शकतो असे सांगितले. त्यानंतर डॉ. विकास आबनावे, डॉ.एस.एन.पठाण, पं.वसंत गाडगीळ, बापूसाहेब भोसले, डॉ. अशोक शिलवंत, लक्ष्मीनारायण रोहिवाल यांनी विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सुनिता ननावरे यांनी केले. आरती सोनग्रा यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.