तीव्र इच्छा शक्तीच्या जोरावर महिलांनी वाटचाल करावी श्रीमती माणिक दामले यांचा सल्ला; मिटसॉट तर्फे जागतिक महिला दिन साजरा
पुणे : आज सर्वच क्षेत्रात महिला पुरूषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. आपल्या बुद्धीमत्तेच्या आणि परिश्रमाच्या जोरावर महिलांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. समाज विज्ञान, शिक्षण, कला, व्यवसाय या क्षेत्रात त्या उत्तम कामगिरी बजावताना दिसत आहोत. असे एकही क्षेत्र नाही ज्यामध्ये महिला प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती बाळगून महिलांनी वाटचाल सुरू ठेवायला हवी. त्यासाठी केवळ वेळेचे व्यवस्थापन नव्हे,तर ऊर्जेचे व्यवस्थापन करने अधिक महत्वाचे व उपयुक्त ठरते.असा सल्ला सामाजिक कार्यकर्ता श्रीमती माणिक दामले दिला. त्याच बरोबर त्यांनी स्वताचे निरीक्षणे नोंदविलेे.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ टेलिकॉम अॅण्ड मॅनेजमेंट तर्फे जागतिक महिलादिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होते. सौ. उषा विश्वनाथ कराड या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ.मिलिंद पांडे हे उपस्थित होते.
सौ.दिपा योगेश पारखी, रेखा पाठक, रेणूका पवार, शिल्पा वंजारी, सोनाली अपसरे व संगिता भास्करवार या महिलांनी मिटसॉटमध्ये उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सौ. उषा विश्वनाथ कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रस्ताविक केले. श्रीमती शोभना यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद केली. प्रा. सौ. शरयू पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संगीता डोके यांनी आभार मानले.