Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

झोकून देण्याच्या वृत्तीमुळेच यश मिळते- मुकेश शर्मा

Date:

पुणे :  ‘‘तुमची झोकून देण्याची वृत्ती आणि मेहनत करण्याची तयारीच तुम्हाला यशापर्यंत पोचवू शकते. जेव्हा मला व्ही. शांताराम यांनी बोलावले होते तेव्हा मी तरुण होतो आणि तितकासा अनुभवी देखील नव्हतो. त्यामुळे मी तेथे सिलेक्ट होणार नाही याची मला खात्री होती. पण माझे नशीब तेव्हा जोरावर होते. त्यामुळे तेथ्लृे माझे सिलेक्शन झाले आणि तेथ्लृूनच माझ्या करिअरची खर्‍या अर्थ्लृाने सुरुवात झाली.’’  अशा शब्दांत श्री. मुकेश शर्मा यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत तर्फे मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी अतिरिक्त महासंचालक श्री. मुकेश शर्मा यांनी प्रसारभारतीच्या माध्यमातून गेली तीन दशके आकाशवाणी व दूरदर्शनमधून केलेल्या भरीव कामगिरीबद्दल‘भारतीय संस्कृती दर्शन जीवन गौरव’हा विशेष पुरस्कार बालेवाडी येथ्लृे राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेच्या समारोप प्रसंगी प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी कानपूर येथ्लृील आयआयटीचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय धांडे, सौ. शिवानी मुकेश शर्मा, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थ्लृापक अध्यक्ष प्रा. विश्‍वनाथ्लृ दा. कराड, मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक श्री. शिवाजी फुलसुंदर, सौ. उषा विश्‍वनाथ्लृ कराड, कॅपजेमीनी इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष किशोर विखे, मॅथ्लृवर्क इंडिया प्रा. लि. चे श्री. प्रशांत राव, रोहमचे व्यवस्थ्लृापकीय संचालक श्री. नाकामुरा दाइसुके, जेनेटीक्स इंडिया प्रा. लि.चे अतिरिक्त महाव्यवस्थ्लृापक नचिकेत जोशी, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, एमआयटीचे संस्थ्लृापक विश्‍वस्त प्रा.पी.बी. जोशी, एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, एमआयटी शिक्षणसंस्थ्लृा समूहाचे कार्यकारी संचालक व रोबोकॉनचे मुख्य समन्वयक डॉ. सुनील कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन.पठाण, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे चे संचालक डॉ. बी. बी. आहुजा व आळंदी येथ्लृील एमआयटी ऍकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. योगेश भालेराव हे उपस्थ्लिृत होते.
श्री. मुकेश शर्मा म्हणाले, ‘‘मी जेव्हा घरातून मुंबईसाठी बाहेर पडलो तेव्हा माझ्या घरातले सगळेजणच खूप घाबरले होते. तेव्हा मी त्यांना सांगितले की माझी काळजी करु नका. मी काही तेथ्लृे निवडला जाणार नाही. पण माझी निवड झाली. आणि त्यानंतर सुरु झालेल्या माझ्या प्रवासानेच मला खूप काही शिकविले. प्रत्येक व्यक्तीने मेहनत, प्रामणिकपणा आणि सकारात्मक विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. तरच तुम्ही स्वत:ची, समाजाची आणि पर्यायाने देशाची प्रगती करु शकता.’’
 डॉ. विश्‍वनाथ्लृ दा. कराड म्हणाले, ‘‘इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडे असणार्‍या निर्मितीक्षमतेला वाव देण्याच्या उद्देशाने श्री. मुकेश शर्मा यांनी रोबोकॉन स्पर्धा भारतात सुरु केल्या. त्याला एमआयटीने भक्कम साथ्लृ दिली. मुकेश शर्मा यांनी गेली तीन दशके सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रेक्षकांसोबत आपली नाळ जोडली आहे. त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून टीआरपी पेक्षा त्यांनी सामान्य माणसांच्या मताला व विचारांना नेहमीच किंमत दिली आहे. हिरकणी, नवरत्न, प्रेरणा, सिनेऍवॉर्ड व कृषी सन्मान असे विविध पुरस्कार त्यांनी सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून सुरु केले आहेत. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून श्री. मुकेश शर्मा यांना भारतीय संस्कृती ज्ञान दर्शन पुरस्काराने आम्ही सन्मानित केले आहे.’’
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शिवाजी फुलसुंदर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. गौतम बापट यांनी केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सदाशिव पेठेत रमेश डाईंग येथे टेरेसवर आग:परिसरात धुराचे साम्राज्य: वाहतुकीचा बट्ट्याबोळ

अग्निशमन दलाकडून चार अग्निशमन वाहने दाखल. आग विझवण्याचे काम...

शांतता पुणेकर वाचत आहेत मध्ये उद्यम विकास सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग

नागरिकांनी रोज रात्री झोपताना काहीतरी वाचण्याची सवय लावावी -...

महाराष्ट्रात थंडी वाढणार,पुढील 48 तास धोक्याचे

मुंबई- महाराष्ट्रात मुंबईसह उपनगरात गारठा वाढू लागला आहे. दुसरीकडे,...

राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे (CPA) ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचा भव्य शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; विद्यार्थ्यांना राष्ट्रीय...