पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार ‘जाहीर झाले आहेत.
यावर्षी डॉ.सतीश देसाई(‘पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष), हेरंब कुलकर्णी (शैक्षणिक , सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक), संजय पवार (नाटककार आणि ज्येष्ठ लेखक), बाबा शिंदे (जेजुरी जवळील ‘पिंगोरी’ गावाचा चेहरा जलसंधारणाच्या माध्यमातून बदलणारे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार) यांची निवड ‘पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’साठी करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी दिली.
‘पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार 2016’ चेवितरण
’महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) च्या असेंब्ली हॉलमध्ये बुधवार, दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे .
महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी पी.ए.इनामदार यांचा 71 वा वाढदिवस असून, पुरस्काराचे
आठवे वर्ष आहे.
‘पी.ए.इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता पुरस्कारा’साठी डॉ. आर.गणेसन (‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’चे संचालक) आणि सईद ए. मौलवी (एम.सी.ई. सोसायटीचे लेखापाल) यांची निवड करण्यात आली आहे .


