पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने ‘हजरत मोहम्मद पैगंबर जयंती’निमित्ताने पाच हजार विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन होऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला.
संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे
१६ वे वर्ष होते.
या मिरवणुकीतील अरबस्तान येथील ‘मदिना’ या पवित्र जागेचे घुमटाचे भव्य तैलचित्र लक्ष वेधक होते. ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल’चे विद्यार्थी अरबी पोषाखात मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी हजरत मोहम्मद पैगंबरांनी दिलेल्या संदेशांच्या घोष वाक्याचे फलक धरले होते. त्यामध्ये प्रामुख्याने ‘पाणी हे पवित्र जल आहे, त्याची बचत करा’, ‘एखाद्याला त्याच्या गुन्ह्याबद्दल माफ करणे ही सर्वांत मोठी संपत्ती आहे’, ‘झाडे अशी लावा की, मनुष्य, प्राणी त्या झाडाखाली सावलीत बसू शकेल’, ‘पाकी आधा इमान है, बात करनेसे पहले सलाम किया करो’, ‘मनुष्याने आयुष्यात एक तरी झाड लावले पाहिजे’, ‘पढोें और पढाओ’, ‘इल्म दिलोंकी रोशनी और आँखोका नूर हैं !’ असे शिक्षण, पाणी वृक्षारोपण व पर्यावरणाचे महत्त्व सांगणारे फलक होते.मिरवणूक आझम कॅम्पस गेट नं. 1 येथून निघून, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, ‘ट्राय लक हॉटेल, गाय कसाब मशीद, बाबाजान दर्गा, सरबतवाला चौक, हुसैनीबाग, क्वार्टर गेट, मॉडर्न बेकरी, इस्लमपुरा, ए. डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पोलीस चौकी, निशांत थिएटर, भगवानदास चाळ, चुडामण तालीम, पूना कॉलेज आणि आझम कॅम्पस गेट नं. 2 येथे मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीची सांगता झाल्यावर विद्यार्थ्यांना फळे व मिठाई वाटण्यात आली.मिरवणुकीमध्ये डॉ. शैला बुटवाला, डॉ. भूषण पाटील, डॉ. किरण भिसे, प्रा. शाहीन शेख, प्रा. आयेशा शेख, प्रा. मुमताज सय्यद, प्रा. नाझनीन काझमी, प्रा. गफ्फार सय्यद, प्रा. अनिता फ्रान्झ, डॉ. मोरेश्वर कोठावदे, शाहीद इनामदार, वाहीद बियाबानी, खालीद अन्सारी, मोहम्मद हनीफ शेख, आरीफ सय्यद, पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.