– पुणे- सलाम पुणे म्हणजे संगीतकारांची -नर्तकांची आणि कलाकारांची आणि रसिकांची आपुलकीची सावली … दूरच्या रानात …केळीच्या बनात …. जावू द्याना घरी … वाजले कि १२ … अशा लोकप्रिय गाण्यांचे संगीतकार हर्षित अभिराज आणि सलाम पुणे चे नाते तर अगदी दृढ … त्यांनी त्यांच्या या गाण्याची पहिली झलक अर्थात आयत्यावेळी ..कसलीही तयारी नव्हती तरी याच व्यासपीठावर सादर केले …मैने ची हवा हवा ….स्वतः संगीतकार हर्षित अभिराज , अभिनेता मयूर लोणकर , अभिनेत्री राधा कुलकर्णी आणि बालकलाकार साहिल मरगजे आदींनी या गाण्याची मजा घेतली .२ मे रोजी झालेल्या महाराष्ट्र दिन सोहळा २०१६ या सलाम पुणे ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हि धमाल अनेक कलाकार -निर्माते -दिग्दर्शक आणि रसिक प्रेक्षकांनी अनुभवली