Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘ध्यान- निरोगी आनंदी व समाधानी जीवनची गुरुकिल्ली’ या विषयावर स्वामी स्मरणानंदजी यांचे प्रवचन

Date:

पुणे,: योगोदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वाय.एस.एस) चे संस्थापक, आध्यात्मिक गुरु व योगी कथामृत ह्या अध्यात्मिक ग्रंथाचे लेखक श्री श्री परमहंस योगानंदजीच्या 125 व्या जयंती निमित्त पुण्यातील कला क्रीडा मंच येथे प्रवचन कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहे. या कार्यक्रमात  संस्थेचे जनरल सेक्रेटरी, स्वामी स्मारणानंदगिरी ध्यान साधनेमुळे होणार्या व्यक्तिगत उन्नती विषयी व्य्ख्यान देणार आहेत . हा कार्यक्रम भारत सरकारच्या संस्कृतीक मंत्रालयच्या सहयोगाने संपन्न होत आहे..
परमहंस योगानंदाची शिकवण सर्व लोकांना आध्यात्मिक  जीवन जगणे आणि शांततापूर्ण जग निर्माण करण्यास सक्षम करते.  योगानंदजीची आध्यात्मिक स्तरांवरील मान्यता आणि मानवजातीच्या  उन्नतीसाठी त्यांचे सर्वदूर योगदान लक्षात घेऊन भारत सरकारच्या संस्कृतिक मंत्रालयाने त्यांची 125 वी जयंती साजरी करण्याचा निश्चय केला आहे.
वाय.एस.एसच्या पुणे ध्यान केंद्रापासून सुरू होणारा जनसंपर्क कार्यक्रम देशभरातील विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमाद्वारे क्रिया योगा मुळे  होणार्या लाभांबद्दल जागरुकता निर्माण केली जाईल. क्रिया योगाचा मार्ग अवलंबून सर्व पंथातील माणसे संतुलित जीवन जगू शकतील  तसेच त्यांना शारीरिक व मानसिक रोग आणि  अज्ञानतून मुक्त होण्यास मदत होईल.
 स्वामी स्मरणानंदजींची गैर-सांप्रदायिक वार्ता आत्मसुधारातील ध्यानाचे महत्व सांगते. ह्या सार्वजनिक वार्तालापाच्या शेवटी ध्यानामध्ये रुचि असणार्यांना स्वामीजींकडून विशिष्ट तंत्र शिवण्याची संधी मिळेल. ह्यासाठी अॉडिटोरियम मध्ये नोंदणी करता येईल.
आज वाईएसएस ही एक अध्यात्मिक आणि सेवाभावी संस्था म्हणून अोळखली जाते. संस्थेचे भारतात रांची, कोलकाता, द्वारहाट (रानीखेत जवळ) आणि नोएडा असे एकूण चार आश्रम तसेच  200 पेक्षा अधिक ध्यान केंद्र आहेत.  सर्व केंद्रामध्ये परमहंस योगनंदांची योगाबद्दलची शिकवण उपलब्ध करुन दिली जाते. ज्यायोगे सत्याच्या जिज्ञासूंना दैवी अनुभुती मिळू शकते.
ही संस्था तिच्या अनेक शैक्षणिक संस्था, निशुल्क चिकीत्सालये, नेत्र व वैद्यकीय शिबीरे,  गरजूंना शिष्यवृत्ती  आणि नैसर्गिक आपत्ती पीडितांना मदत अश्या विविध मार्गांनी मानवजातीची सेवा करत आहे.
प्रधानमंत्री  नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली  2017 मध्ये विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे संस्थेच्या शताब्दी निमित्त टपाल तिकीट जारी केले गेले.
‘ध्यान – स्वस्थ आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ सार्वजनिक चर्चेमुळे होणारे  फायदे:
1. आपले ध्यान आणि कार्यक्षमता वाढवा
2. अधिक स्पष्टता आणि खोलीसह परिस्थितींचे विश्लेषण करा
3. ध्येय साध्य करण्यासाठी आणि सवयी बदलण्यासाठी आपल्या इच्छाशक्तीमध्ये सुधारणा करा
4. जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन मिळवण्यासाठी अंतर्ज्ञान विकसित करा
5. इतरांचा दृष्टिकोन समजून घ्या  कुटुंब आणि समूहामध्ये अधिक सुसंगतपणे कार्य करा
6. जीवनाचा एकसंध उद्देश समजून घ्या.
दिवस: शनिवार, 6 अॉक्टोबर, 2018
वेळ: सायंकाळी 5:30 वाजता सुरू
स्थान: गणेश कला क्रिडा मंच, स्वारगेट, पुणे
प्रवेश: सर्वांसाठी विनामुल्य
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...