कुमार प्रॉपर्टीजला एशियास ग्रेटेस्ट ब्रांड इन रियल इस्टेट सेक्टर अवॉर्ड
पुणे-सिंगापूर येथील मरीना बे सँड्स येथे नुकताच इंडो-सिंगापूर बिझनेस आणि “एशियाज ग्रेटेस्ट ब्रांडस अँड लीडर्स” हा अवॉर्ड सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. युक्रेनचे राजदूत आणि मंत्री, सिंगापुरमधील कझाकस्तान दूतावासाचे कॉन्सुलर फैझराखान कॅसेंनोव्ह आणि अनेक मातब्बर मंडळी ह्या सोहळ्याला उपस्थित होत्या.
“एशियाज ग्रेटेस्ट ब्रांडस इन रियल इस्टेट सेक्टर” हा अवॉर्ड कुमार प्रॉपर्टीजच्या प्रीव्ही रेसिडेन्सेस या ब्रांडला देण्यात आला. प्रीव्ही रेसिडेन्सेस हा ब्रांड श्री. राजस विमलकुमार जैन, एम. डी, कुमार प्रॉपर्टीज आणि वैशाखी फडके, ए. जी. एम मार्केटींग यांच्या नेतृत्वातून साकार झाला आहे.
कुमार प्रॉपर्टीज गेली ५० वर्षे भारतात रियल इस्टेट क्षेत्रात काम करत असून आंतरराष्ट्रीय स्थरावर ओळख मिळणे ही आमच्यासाठी एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे वक्तव्य श्री. राजस जैन ह्यांनी अवॉर्ड स्वीकारताना केले. आमच्या ५० वर्षाच्या अथक परिश्रमांना व समर्पणाला मिळालेली ही कौतुकाची थाप असून त्याचा परिणाम म्हणून प्रीव्ही रेसिडेन्सेस ला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे असे बोलून त्यांनी आपला आनंद ह्याप्रसंगी व्यक्त केला.