नवी दिल्ली-
गोव्यातला झुआरी पूल पूर्णपणे कार्यान्वित झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवेकरांचे अभिनंदन केले आहे.
या पूलामुळे दळणवळण व्यवस्था सुधारून गोव्यात पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
“झुआरी पूल पूर्णपणे कार्यरत झाल्याबद्दल, गोवेकरांचे अभिनंदन! ह्या महत्वाच्या प्रकल्पामुळे, उत्तर आणि दक्षिण गोव्यातील दळणवळण व्यवस्था सुधारेल, पर्यायाने, येत्या काळात या प्रदेशातील वाणिज्य आणि पर्यटनाला चालना मिळेल.”

