मुंबई
उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा अवमान करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, खा. राहुल गांधी यांच्या निषेधार्थ कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भारतमाता सिनेमा ते लालबाग पोलीस स्टेशनपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी खा. कल्याण बॅनर्जी, राहुल गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबतची तक्रार काळाचौकी पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली.
किमान सभापतींच्या घटनात्मक पदाचा तरी मान राखला जावा. देश हे कायम लक्षात ठेवेल जेव्हा देशाचे उपराष्ट्रपती आणि घटनात्मक संस्थेची अशी खिल्ली उडवली जात होती, तेव्हा राहुल गांधी उभा राहून त्याचा व्हिडिओ करीत होते. भारत तोडणाऱ्यांना पाठिशी घालून भारताला जोडण्याचे नाटक करणाऱ्यांचा मुख्य अजेंडा संघटित करण्याचा नसून तोडणे हा आहे. देशाचे नागरिक २०२४ मध्ये या घमेंडखोरांचा अहंकार नक्कीच संपवतील अशीही टीका यावेळी करण्यात आली.
यावेळी दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर, भायखळा विधानसभा मंडल अध्यक्ष नितीन बनकर, भाजप मुंबई उपाध्यक्ष राजेश हटले यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

