स्पा, मसाज सेंटरमध्ये वाढलेल्या गैरप्रकाराबाबत, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले महत्त्वाचे निर्देश!
राज्यातील स्पा आणि मसाज सेंटरमधील गैरप्रकार रोखण्यासाठी उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या गृहसचिवांस सूचना.
मुंबई दि. 27 नोव्हेंबर 2024 : नवी मुंबई येथील स्पा सेंटरमध्ये, काम करणाऱ्या, मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत नवीमुंबई पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केलेला आहे. याची गंभीर दखल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. याबाबत राज्याचे अपर मुख्य सचिव, गृहविभाग यांना असे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील सर्व स्पा, मसाज सेंटर, पार्लर येथे गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी मोहिम राबविण्यात यावी. तिथे काम करणाऱ्या मुली व महिला यांच्या सुरक्षितेची जबाबदारी स्पा चालक यांची राहील याचे प्रतिज्ञापत्र परवाना देताना घेण्यात यावे.
नवी मुंबई येथे घडलेल्या घटनेतील आरोपीस तत्काळ अटक करून गुन्ह्याचा तपास निष्णात पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करावा व सत्वर दोषारोप पत्र दाखल करावे. अशा सूचना डॉ. नीलम गोन्ह यांनी दिल्या आहेत.