पुणे:
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, प्रचाराचा झंझावात केला आणि एकूण ९९ ठिकाणी त्यांच्या रॅली, रोडशो आणि सभा झाल्या. अवघ्या १३ दिवसांच्या प्रचारात कामठी मतदारसंघासह राज्यात त्यांनी धुव्वाधार प्रचार केला. प्रचाराच्या रणधुमाळीत एका दिवशी सरासरी ते ८ सभांना संबोधित केले. कामठी येथे नितीन गडकरी यांच्यासह त्यांनी अखेरची जाहीर सभा घेत प्रचाराची सांगता केली.
श्री बावनकुळे यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान नाशिक येथे मोदीजींच्या सभेत उपस्थिती लावली. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव तसेच केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह जाहीर सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी महायुती सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहचविली. लाडकी बहिण योजनेचा लाभ वाढवून २१००, अन्नपूर्णा योजनेतून ३ सिलिंडर मोफत, लेक लाडकी, मुलींना मोफत शिक्षण, अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा, वीज बिलमाफी, किसान सन्मान निधी 12 हजाराचा 15 हजार करणार, एमएसपीवर भावांतर योजना लागू करुन सोयाबीनला 6000 भाव देणार यासह अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. उद्योग, रोजगार इत्यादींबाबत त्या त्या मतदारसंघात सरकारने काय काम केले, अशा बहुतेक स्थानिक मुद्यांवर त्यांनी भर दिला.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा झंझावती प्रचार दौरा
- जाहीर सभा – २७
- पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्यासोबत सभा – १
- गाव भेटी – ११०
- कामठी – मौदा मतदारसंघात – ५८ सभा
- बाईक रॅली – १३