पुणे: लाडकी बहीण नावाने सध्या टेलिव्हिजनवर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू असून नागरिकांची गोंधळलेली अवस्था झाली आहे. भावाने केलेल्या मदतीची कधीही जाहिरात केली जात नाही. स्वतःच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकून पैसे दिल्यासारखी जाहिरात सुरु आहे.गोरगरिबांचे शोषण करून विविध माध्यमातून जमा केलेला कर हा आपलाच पैसा आहे. लाडकी बहिणी योजनेतून थोडासा तो परत येत आहे. राज्यात महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा अनेक समस्या आहेत. तीन वर्षाची मुलगी असो की 70 वर्षाची आजी सुरक्षित नाही. बलात्कारांच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. भाजपशी संबंधित कुठल्याही घटनेत गुन्हा दाखल होत नाही. रात्री – अपरात्री घडणाऱ्या गुन्हेगारी घटना दिवसाढवळ्या समाज माध्यमांसमोर आणि पोलीस स्टेशन मध्ये घडत आहेत. कोयता गँग चा हैदोस, पोलिस सुरक्षित नाहीत. तर ते आपल काय रक्षण करणार ? असे आरोप करत विविध मुद्द्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी जहरी टीका केली.
महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची विजय प्रारंभ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुषमा अंधारे,मोहन जोशी , अंकुश काकडे,बाळासाहेब ओसवाल,अशोक हरणावळ,स्वाती पोकळे,भगवानराव साळुंखे,किशोर कांबळे,राजाभाऊ कांबळे,राहुल तुपेरे,शैलेद्र नलावडे, शशिंकात तापकीर,सुरज लोखंडे,अमोल रासकर,सचिन देडे,संतोष पाटोले,रमेश सोनकांबळे,गणेश मोहिते,सचिन जोगदंड,तुषार नांदे,ऋषिकेश भुजबळ,निलेश पवार,लखन वाघमारे,समीर पवार,सौरभ माने,रोहित माळी ,अमोल ननावरे,संजय दामोदरे,अमोल परदेशी,सद्दाम शेख,निलेश खंडाळे,स्वप्निल खडके,पिरदिप शिवशरण,पुष्कर अबनवे,बाळासाहेब अटल,भरत सुराणा,विजय हिंगे,सचिन पासळकर,अनिल सातपुते,रवी ननावरे ,विद्या ताकवले, रुपाली बिबवे मृनाली वाणी आदी महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या,”भाजपाचे नेते महिला संदर्भात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ भाषा वापरतात. अडीच वर्षात 70 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा झाल्या, त्यामध्ये 65 परीक्षेत पेपर फुटी झाली. हे पेपर फोडणारे कोण ? सरकारी जागा भरण्याची भरती प्रक्रिया खाजगी ठेकेदारांना देण्यात आली हे सर्व ठेकेदार देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित आहेत. भाजप आदानी – अंबानी संबंध आहे, मग गरिबांसाठी कोण आहे ?
माधुरी मिसाळ या भाजपच्या प्यादा आहेत. मी त्यांच्यावर शब्दही बोलणार नाही कारण माझे टार्गेट वजीर आहे आणि त्याचे नाव देवेंद्र फडणवीस आहे. आया – बहिणींची अब्रू सुरक्षित ठेवण्यासाठी, बेरोजगार हातांना काम देण्यासाठी, महागाईचा दर कमी करण्यासाठी, गुंडशाही दडपशाही चा बंदोबस्त करण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी अश्विनी कदम यांना विजयी करण्याचे आवाहन अंधारे यांनी केले.यावेळीमहाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांनी मागील पंधरा वर्षातील आपल्या कामाचा आढावा मतदारांना सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल खडके यांनी केले.
दलित स्वयंसेवक संघ या संघटनेच्या पाठिंबामुळे रमेश बागवे यांना मंत्रीपद मिळाले होते. याच दलित स्वयंसेवक संघ ने आज महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला. यावेळी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या नातू सचिन साठे,प्रशांत शिरसागर, श्रीकांत मेमाणे,नरेश बागुल, पराग थोरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.