मुंबई-
मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये एका 64 वर्षीय महिलेवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपीने या पिडीत महिलेच्या चेहऱ्यावर, डोक्यात, प्रायव्हेट पार्टवर आणि शरीरावर अमानुष वार केले आहेत.या घटनेनंतर ती बेशुद्ध झाली आहे. आरोपीने महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या पिडीत महिलेची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत, तर या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही पीडित महिला रस्त्यावर आढळून आली . एका स्मथानिक हिलेने संबधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, महिलेला उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी उमेश गुलाबराव ढोक वय 38 वर्ष याने महिलेला घरी सोडतो असं सांगून महिलेला आपल्या घरी नेले. त्यानंतर त्याने महिलेवर अत्याचार केले. महिलेने विरोध केल्यावर आरोपीने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं आणि आरोपी पळून गेला.

