पुणे-एका विवाह कार्यक्रमातून डाॅक्टर महिलेचे १२ लाख ६० हजारांचे हिरेजडीत सोन्याचे मौल्यवान दागिने अज्ञात आरोपीकडून चोरीला गेल्याची घटना बिबवेवाडी भागातील नामांकित मंगल कार्यालयात घडली आहे.
याबाबत संबधित डाॅक्टर महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार डाॅक्टर महिला मूळच्या जळगाव मधील रहिवासी आहेत. त्यांच्या नात्यातील एका नातेवाईकचा विवाह बिबवेवाडीतील यश लाॅन कार्यालयात होता. त्या महाराष्ट्र एक्सप्रेस गाडीने पुणे रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. तेथून त्या बिबवेवाडीतील मंगल कार्यालयात लग्नास आल्या. विवाह समारंभात दागिने परिधान करण्यासाठी त्यांनी त्यांची बॅग उघडली. तेव्हा बॅगेत ठेवलेले १२ लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.दरम्यान, तक्रारदार महिलेकडील सोन्याचे दागिने प्रवासादरम्यान चोरीला गेल्याची प्रार्थामिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे याबाबत पुढील तपास करत आहेत.

