प्रदेशच्या नेत्यांना सवाल,कॉंग्रेस संपवायला निघालात काय ?
पुणे- पुण्यातील कॉंग्रेसच्या आनंदाला ग्रहण लागल्याचे स्पष्ट झालेले आहे.ज्या जुन्या ज्येष्ठ नेत्यांनी कॉंग्रेस चांगल्या आणि वाईट काळातही जिवंत ठेवली कॉंग्रेसचा झेंडा सोडला नाही त्यांच्या हातून कॉंग्रेसचा झेंडा आता हिसकावून काढून घेतला जाऊ लागला आहे.काही जणांनी या निवडणुकीत असा प्रयत्न हाणून पाडला तरी काहींचा बळी देण्यात प्रदेशचे नेते यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.
काल रात्री प्रदेश कॉंग्रेस ने १६ जणांना निलंबित केल्याची यादी व्हाटसएप वरून व्हायरल केली त्यात पुण्यातील कोणाचे नाव नव्हते.पण पुण्यातील नेत्याने काल रात्रीच २ याद्या व्हायरल केल्या त्यात पुण्यातील कसबा,शिवाजीनगर आणि पर्वती येथील उमेदवारांनी बंडखोरी केल्याने त्यांना निलंबित केल्याचे म्हटले होते.मात्र हीच यादी प्रदेश कॉंग्रेस ने आज सकाळी व्हायरल केली.
आम्हाला आहे न्याय मागण्याचा अधिकार –
राहुल गांधी न्याय का अधिकार या नावाने संमेलने घेत आहेत पण त्यांच्याच पक्षातील काही नेते जुन्या जाणत्या नेत्यांवर देखील अन्याय करण्याचे सोडत नाहीत हे पुण्यातून स्पष्ट होऊ लागले आहे . ४० वर्षे पुण्यात कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सलग नगरसेवक देखील राहिलेल्या आबा बागुल यांनी आता कमल व्यवहारे आणि मनीष आनंद यांच्या नंतर आपली व्यथा व्यक्त केली आहे.
आबा बागुल हे सध्या पर्वती विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत.वास्तविक पाहता त्यांना शरद पवारांच्या यांच्या पासून ते नाना पटोले, विजय वडेट्टीवार,पर्यंत असंख्य नेत्यांनी बागुल यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना आता आमदारकी द्यायलाच हवी असे विधान सभा आणि भाषणातून वेळोवेळी केले.राष्ट्रवादी ला आघाडीत असल्याने पर्वती मतदार संघ लढण्यास दिला असता वारंवार भाजपकडून राष्ट्रवादीचा पराभव झाल्याने आता कॉंग्रेस कडे मतदार संघ घेऊन आबा बागुलांना येथून आमदारकीची संधी द्यावी असे सर्वांनी मान्यही केले.मात्र प्रत्यक्षात उमेदवारी वाटपाच्या वेळी आबांचा घात झाला…आणि आता आबा यांनाच बंडखोर म्हणून पक्षातून निलंबित केल्याचे कॉंग्रेस नेते जाहीर करत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर एकीकडे पर्वती मतदार संघात नागरिकांचा मोठा पाठींबा घेऊन लढताना स्वकीयांनीच असे घात सुरु केल्याने आबा बागुल रुग्णालयात पोहोचले आणि तिथून त्यांनी आता राहुल गांधींना साद घातली आहे….प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांना काही सवाल केले आहेत..मी निष्ठावंत च आहे..गद्दार नाही आणि बंडखोर हि नाही..माझ्यावर अन्याय तर करतच आला पण निलंबनाची जी तलवार चालविली आहे ती देखील घटनाबाह्य असल्याने बोथट झालेली आहे.अशी एकूण भूमिका त्यांनी घेतल्याचे वृत्त आहे.दरम्यान याबाबत आबा यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच तोंडून…..
मी काँग्रेस पक्षाचा निष्ष्ठावंत पाईक : आबा बागुल
- निष्ठावंतांवर असा अन्याय होणार असेल तर नवीन कार्यकर्त्यांनी काय करावे
मी हॉस्पिटलमध्ये आजारी असल्याने उपचार घेत असताना, तडकाफडकी माझे निलंबन करणे योग्य नाही़ काँग्रेस पक्षाने निलंबनाच्या दोन याद्या का काढल्या़ एक यादी पूर्वी काढली़ त्यात माझे नाव नव्हते़ नंतर दुसरी यादी काढली गेली, यात माझे नाव आले़ त्यामुळे प्रदेश कॉगे्रसवर कोणाचा दबाव होत, असा प्रश्न आबा बागुल यांनी उपस्थित केला़
याबाबत पत्रकार परिषेदत बोलताना बागुल म्हणाले, काँग्रेस पक्षाने निलंबनाच्या दुसर्या यादीत आणखी नावे लिहिण्यासाठी काही स्पेस ठेवली आहे आणि त्यानंतर नाना गावंडे यांची सही आहे़ नक्की यातून कोण काँग्रेस संपविण्यासाठी प्रयत्न करीत आहे हे पाहणे गरजेचे आहे़ मी काँग्रेस विचाराचाच पाईक आहे़ काँग्रेस पक्षाचाच एक निष्ठावंत आहे व माझ्या बरोबर अशी निलंबनाची कारवाई होत असेल तर, माझ्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी करायचे काय़ आपण मला वेळोवेळी २००९ पासून विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितले ते मी ऐकले व मागे हटलेलोही आहे़ माझी संधी तीन वेळा हिरावून घेतली गेली आह़े जो पक्ष तीन वेळा पर्वती विधानसभा मतदार संघात हारतो, त्यांनाच पुन्हा पुन्हा हा मतदार संघ सोपविला जातो, की जो मतदार संघ कॉग्रेसचा बालेकिल्ला होता़ त्यामुळे हे कितपत योग्य आहे़ अशावेळी माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांने करायचे काय असा प्रश्न आबा बागुल यांनी काँग्रेस पक्षाकडे उपस्थित केला़ निष्ठेची कदर होणार नसेल तर नवीन पिढी काँग्रेसकडे कशी येणाऱ याचा विचार करून आपण माझे निलंबन मागे घ्याल असा मला विश्वास आहे़ मी काँग्रेस पक्ष वाचविण्याकरिता व वाढविण्यासाठी हा प्रयत्न करीत आहे, असेही आबा बागुल यांनी सांगितले़ तसेच मी काँग्रेस पक्षाच्या विरोधात लढत नाही़ ही महाविकास आघाडी ही तोंडी आघाडी आहे, ही कुठेही अधिकृतरित्या आघाडी म्हणून नोंद केलेली नाही़ उद्या आघाडीतील घटक पक्षांनी आपल्याला जर दगा दिला तर याला कोण जबाबदार असेल़ यापूर्वीही पुणे महापालिकेत पुणे पॅटर्न झालेला आहे़राष्ट्रवादी काँग्रेस, सेना व भाजप एकत्र आलेले आहेत याची आठवण यावेळी आबा बागुल यांनी करून दिली़