मतदार संघातील कुटुंबा कुटुंबांची कौटुंबिक काळजी घेणारे कामच मला विधानसभेत पाठवेल
पुणे- कक्षा रुंदवा हा संघ आदेश शिरस्थ मानून आपण मार्गस्थ झालो आणि वरीष्ठांचे मार्गदर्शन घेत मतदार संघातील कुटुंबा कुटुंबांची कौटुंबिक काळजी घेणाऱ्या कामाला प्राधान्य देत महापालिकेत काम केले हे कामच मला विधानसभेत पाठवेल असे येथे खडकवासला विधानसभा मतदार संघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या मंजुषा दीपक नागपुरे या माजी नगरसेविकेने म्हटले आहे. भीमराव तापकीरांना ३ वेळा संधी दिली आता पक्ष माझा विचार करेल याचा विश्वास आहे असेही त्या म्हणाल्या…
त्या म्हणाल्या,’ ज्या समाजाने आपल्याला घडवले वाढवले तो समाजच आपले कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाची काळजी घेणे हेच आपले परम कर्तव्य ही संघ विचारसरणी मनी घट्ट करत दीपक नागपुरे आणि शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून, तसेच महापालिकेच्या माध्यमातून आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने सेवाभावनेने काम केले आहेत. मंपरिपूर्ण विकासाचे ड्रीम मॉडेल सिंहगड रोड परिसरामध्ये तयार केले आहे. सन 2012 पासून पुणे महापालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर मुलभूत सुविधांची पूर्ती ते अभिजातपणाने परिपूर्ण विकासाचे ‘ड्रीम’ मॉडेल प्रत्यक्षात उतरवल्यानंतर संघ आदेशाने आत्ता संपूर्ण खडकवासल्याचा अभिजात परिपूर्ण विकासाचा संकल्प केला आहे. समाजाशी जुळलेली बारा वर्षांची नाळ या ‘संकल्पयज्ञा’ची एक चळवळ सुरू झाली असून संपूर्ण मतदारसंघात असंख्य नागरिकांचा पाठींबाही मिळत आहे.असेही त्या म्हणाल्या
सात उद्यानांची निर्मिती-नागपुरे
पुणे महानगरपालिकेत काम करताना ‘चैतन्य’ बागेच्या माधम्यातून मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी हक्काची जागा निर्माण झाली आहे. कै. बाळासाहेब कुदळे बागेत कार्यक्रमासाठी भव्य हॉल आणि जॉगिंग ट्रॅक अन् मुलांची शरीरयष्टी पीळदार होण्यासाठी मल्लखांब ची उभारला आहे. वडगाव बुद्रुक परिसरात कै. सौ. शांताबाई चरवड उद्यानात हिरवळीच्या सान्निध्यात फिरणे शक्य झाले आहे.
प्रथम अर्बन फुटपाथ मूल्य संस्कार शिल्पाची निर्मिती- नागपुरे
सनसिटी रस्त्यावर अर्बन फुटपाथ निर्मितीत योगासनांची सुंदर चित्रे काढल्याने सौंदर्यात भर पडलीच परंतु अर्बन फुटपाथवर ओपन जिम निर्माण करुन व्यायामाची विविध अत्याधुनिक साधने बसवल्याने या साधनांचा मोफत लाभ घेत ज्येष्ठ नागरिकांची घटकाभर विश्रांतीची सोय झाली. संस्कार शिल्पातून नवीन पिढी सूर्याप्रमाणे तेजस्वी तयार होईल या संकल्पनेवर आधारित संस्कार शिल्प तयार केल्याने माता-भगिनींसाठी एक दिशादर्शक निर्माण झाला आहे. बलक शिल्प सिंहगड परिवार क्षेत्रिय कार्यालयाच्या चौकात ‘ढोल पथक शिल्प उभारले. या शिल्पात साकारण्यात आलेला उत्साह आणि जोश पाहून नागरिकाच्या मनात चैतन्य निर्माण होते.असेही मंजुषा नागपुरे यांनी म्हटले आहे.