Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शेतकऱ्यांपर्यंत वीज पोहचविण्यासाठी २७७३ कोटींच्या कामांचा शुभारंभ

Date:

उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात

सोलापूरदि०८ ऑक्टोबर २०२४: राज्यातील २४२ शासकीय व सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या हस्ते सोलापूर येथे करण्यात आले. त्याचसोबत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील वीज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पायाभूत वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी २७७३ कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. 

या कार्यक्रमाला आ. सुभाष देशमुख, आ. विजय देशमुख, आ. शहाजी पाटील, आ. संजयमामा शिंदे, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी आणि आ. राम सातपुते, माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपसा जलसिंचन योजनांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा व्हावा आणि किफायतशीर दरात वीज उपलब्ध व्हावी यासाठी या योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या कामाला आज सुरुवात झाली. यासाठी राज्य सरकारने ३३६६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी राज्याचा ऊर्जा विभाग, महावितरण आणि जलसंपदा विभाग सहकार्याने काम करत आहे. जलसंपदा विभागाने सौर ऊर्जीकरण प्रकल्पांसाठी साडेतीन हजार एकरपेक्षा अधिक जमीन उपलब्ध करून दिली आहे. या योजनेत ९०५ मेगावॅट इतकी सौर ऊर्जानिर्मिती क्षमता निर्माण होणार आहे.

टेंभू, जिहे कठापूर, ताकारी, लोअर वर्धा, अप्पर प्रवरा अशा सर्व लहानमोठ्या उपसा सिंचन प्रकल्पांना आता सौर ऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज उपलब्ध केली जाईल. विशेष बाब म्हणजे १२० सहकारी उपसा सिंचन योजनांचेही सौर ऊर्जीकरण या योजनेत करण्यात येणार आहे. आगामी दोन वर्षात ही कामे पूर्ण होतील. राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील आणि सिंचन क्षेत्रातील हे ऐतिहासिक पाऊल आहे. 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत सध्या ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात वीज निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत वीज पोहचविण्यासाठी आरडीएसएस योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा बळकटीकरण करण्यासाठी शासनाने ३००० कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व उत्तर महाराष्ट्रातील १६९७ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ आज झाला. यामध्ये ९० नवी वीज उपकेंद्रे उभारणे, २३८ ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढ आणि १,७०५ किलोमीटर लांबीच्या ३३ केव्हीच्या उच्च दाब वाहिन्या बसविणे अशा कामांचा समावेश आहे.

याखेरीज एआयआयबी योजनेअंतर्गत १०७६ कोटी रुपयांची पायाभूत सुविधा बळकटीकरणाची कामेही सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये ६० नवीन वीज उपकेंद्रे, ३१ पॉवर ट्रान्सफॉर्मर क्षमतावाढ, १४३३ किलोमीटर लांबीच्या ३३ केव्हीच्या उच्च दाब वाहिन्या बसविणे, अशीही कामे हाती घेण्यात येत आहेत.

या कार्यक्रमात सोलापूर तालुक्यातील महिला शेतकरी महानंदा तेली व द्वारकाबाई गुरव यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून कृषिपंपांचे वीजबिल शासनाने भरल्याची पावती उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक सुनील पावडे, पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता अंकुश नाळे आणि अधीक्षक अभियंता सुनील माने उपस्थित होते.

सोबत फोटो –

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...