शहरातून हेलीकॉप्टर जाते म्हटले कि आता वाटेल भीती …
पुणे – बावधन येथे आज बुधवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि एक अभियंता होता. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. बावधन येथील केके कन्स्ट्रक्शन हिलजवळ सकाळी 6.45 च्या सुमारास ही घटना घडली. हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी जात होते. त्या आधीच हा अपघात घडला.
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईला घेऊन जाणार होते. या हेलिकॉप्टरमधून सुनील तटकरे प्रवास करत होते. बुधवारी सुनील तटकरे यांना घेण्यासाठी पुण्याहून मुंबईला जात असताना हेलिकॉप्टरचा अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी अजित गटाचे रायगडचे खासदार सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते. हेलिकॉप्टरने मुंबईत आले असते, तर तटकरे मुंबईहून पुण्याला जाणार होते. पण, पुण्याहून उड्डाण घेतल्यानंतर ते कोसळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सच्या हेलिपॅडवरून उड्डाण केले होते. टेकऑफनंतर सुमारे 10 मिनिटांनी हेलिकॉप्टर 1.5 किमी अंतरावर कोसळले. डोंगराळ भागात हा अपघात झाला. सकाळी तिथे दाट धुके होते.
अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. हेलिकॉप्टर सरकारी की खासगी हे अद्याप समजू शकलेले नाही. मृतांचीही ओळख पटू शकली नाही. घटनेनंतर लगेचच बचावकार्यासाठी दोन रुग्णवाहिका आणि चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळतात पुणे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले तो रहिवासी भाग नसल्याने मोठी दुर्गघटना टळली. हेलिकॉप्टरमध्ये तिघे प्रवास करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हे प्रवासी कोणत्या दिशेने जात होते, याची माहिती देखील अद्याप समोर आलेली नाही.गेल्या महिन्यात 24 ऑगस्ट रोजी देखील पुणे जिल्ह्यातील पौड जवळ असलेल्या घोटावडे या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली होती. मुंबईमधील ग्लोबल या कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. यामध्ये पायलटसह तीन प्रवाशी होते. या घटनेचा एक व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. या परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींची मदत केली होती. मुंबईतील ग्लोबल कंपनीचे AW 139 या हेलिकॉप्टर होते. या अपघातामध्ये कॅप्टन आनंद यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये असलेले धीर भाटिया, अमरदीप सिंग, एसपी राम हे जखमी झाले होते. जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हवण्यात आले होते.

