आयसीसीआरतर्फे 27 सप्टेंबरला गायन-नृत्य मैफल

Date:

आयसीसीआरतर्फे 27 सप्टेंबरला डॉ. अर्चना सहकारी यांचे गायन तर मौमिता वत्स घोष यांचा ओडिसी नृत्याविष्कार
पुणे : केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) पुणे विभागीय कार्यालय आणि भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 27 सप्टेंबर) हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका डॉ. अर्चना सहकारी यांच्या गायनाचा तसेच ओडिसी नृत्यांगना मौमिता वत्स घोष यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
‌‘होरायझन‌’ उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता सेनापती बापट रोड जवळील भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात होणार आहे, अशी माहिती भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयाचे निदेशक सुदर्शन शेट्टी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
डॉ. अर्चना सहकारी यांनी गुरुकुल पद्धतीने सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अलका देव-मारुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले आहे. शास्त्रीय गायनासह धृपद, ख्याल, टप्पा, चतुरंग, तराणा, ठुमरी, भजन, गझल, भावगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीत या प्रकारात त्यांचे प्रभुत्व आहे. डॉ. अर्चना सहकारी या अनेक पुरस्कारांनी सन्मानित असून देश-विदेशातील प्रसिद्ध संगीत महोत्सवात त्यांनी आपली गायन कला प्रस्तुत केली आहे.
मौमिता वत्स घोष यांनी लहान वयातच गुरू माधवी मुद्गल यांच्याकडे नृत्याचे धडे घेतले. तसेच विख्यात गुरू, पद्मविभूषण केलुचरण मोहपात्रा यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. मौमिता यांनी देश-विदेशात नृत्याचे कार्यक्रम सादर केले असून अनेक नृत्य महोत्सवात त्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

पुणे,: "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक...

हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त...

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी...