‘रन फॉर फोर्ट’ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

Date:

– आमदार सिद्धार्थ शिरोळे व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ
– गड किल्ले, जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनाच्या प्रचारासाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

पुणे, दि. २३ सप्टेंबर, २०२४ : जिल्हाधिकारी कार्यालय व पुरातत्व विभागाच्या वतीने नुकतेच ‘रन फॉर फोर्ट’ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. फर्ग्युसन महाविद्यालय येथून सुरू झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेस आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. या मॅरेथॅान स्पर्धेसाठी शिरोळे यांनी आपल्या आमदार निेधीतून १० लाख रूपये दिले आहेत.

पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दाणी, दिनेश काळे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ अंतर्गत जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित करण्यात आले असून यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे डॉ सुहास दिवसे यांनी सांगितले.

डॉ. दिवसे पुढे म्हणाले, “ आज ३५० वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास आपणा सर्वांना स्फूर्ती आणि प्रेरणा देत आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिगत, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात त्यांचा ठसा उमटलेला आहे. युनोस्कोने राज्यातील ११ किल्ले वारसा नामांकनासाठी निवडले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड हे तीन किल्ले आहेत. हे सर्व गड किल्ले आपणास वारसा नामंकनात आणायचे आहेत.”

छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे राजे आहेत. त्यांची ओळख जगाला व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. किल्ल्यांचे महत्त्व, गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सांस्कृतिक वारसा आपण कसा जपत आहोत हे युनोस्को समोर आपल्याला प्रदर्शित करायचे आहे. जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित किल्ल्यांबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील तीनही किल्ल्यांचे जीएसआय कोड द्वारे मॅपिंग स्टोरी तयार केली आहे अशी माहितीही डॉ दिवसे यांनी दिली.

आमदार शिरोळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील ११ गड किल्ले वारसा नामांकनासाठी निवडले आहेत याचा मनापासून आनंद  आहे. पुणे जिल्ह्यातील तीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.”

स्पर्धेसोबतच यावेळी दुर्मिळ शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्वेनगर दुर्घटनेतील जखमी रुग्णाची महापौर मंजूषा नागपूरे यांनी दीनानाथ रुग्णालयात घेतली भेट

पुणे :कर्वेनगर येथील मेघराज सोसायटीसमोर झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी...

नदीपात्र खराब करणारांवर तातडीने कडक कारवाई करा – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे- पुण्याच्या नदीपात्रात कचरा , राडारोडा टाकून अगर अन्य...

तिसऱ्या तिमाहीत भारत फोर्ज ला संरक्षण क्षेत्रातील १,८७८ कोटी रूपयांच्‍या ऑर्डर्स

भारत फोर्जकडून आर्थिक वर्ष २०२६ च्‍या तिसऱ्या तिमाहीत प्रबळ...

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही प्रशासनाकडून दिरंगाई ही खूप क्लेशदायी -आ.हेमंत रासने

शहराच्या मध्यवर्ती भागातील भुयारी मार्गांचा डीपीआर तात्काळ करा! -आ.हेमंत...