नवी दिल्ली-आतिशी यांनी शनिवारी दिल्लीचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज निवास येथे एलजी विनय सक्सेना यांनी त्यांना शपथ दिली. आतिशी दिल्लीच्या सर्वात तरुण आणि तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या. त्यांच्या आधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या.
आतिशी यांच्यानंतर सौरभ भारद्वाज. गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात मुकेश अहलावत हे एकमेव नवीन चेहरा आहेत.
43 वर्षीय अतिशी कालकाजी मतदारसंघातून तीन वेळा आमदार आहेत. आतिशी यांनी केजरीवाल यांचा दिल्लीचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही मोडला आहे. अतिशी 43 वर्षांच्या आहेत, तर केजरीवाल 2013 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा 45 वर्षांचे होते. 17 सप्टेंबर रोजी केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आप आमदारांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशी यांचे नाव निश्चित केले होते.आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आतिशी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
अतिशी पाच महिन्यांपेक्षा कमी काळ मुख्यमंत्री राहतील
दिल्ली विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपत आहे. सध्याच्या सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्याच्या तारखेपूर्वी निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया पूर्ण करतो. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 15(2) मध्ये असे म्हटले आहे की विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या 6 महिन्यांपूर्वी निवडणुकीची अधिसूचना काढता येत नाही.याचा अर्थ निवडणूक आयोगाला पाच महिन्यांत दिल्लीत विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील. मात्र, राजीनामा जाहीर करताना केजरीवाल यांनी दिल्लीत लवकर निवडणुका घेण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले होते. लेफ्टनंट गव्हर्नर आणि निवडणूक आयोग तयार असल्यास विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच दिल्लीत निवडणुका होऊ शकतात. त्यानुसार आतिशी पाच महिन्यांपेक्षा कमी काळ मुख्यमंत्री राहतील.