Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रॅपिडोतर्फे वेस्टब्रिज कॅपिटलच्या नेतृत्वाखाली सीरीज ई फंडिंगमध्ये २०० दशलक्ष डॉलर्स निधीची उभारणी

Date:

●    नुकत्याच झालेल्या फंडिंग राउंडमुळे रॅपिडोचे मूल्यांकन वाढून १.१ अब्ज डॉलर्सवर

●    या गुंतवणुकीमुळे शहरी वाहतूक क्षेत्रात रॅपिडोचा विस्तार आणि नेतृत्वाला बळकटी मिळणार

●    युजर्समध्ये झालेल्या वाढीमुळे गुंतवणूक, जीएमव्हीमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत २.५ पटींची वाढ, २.५ दशलक्ष दैनंदिन राइड्स पूर्ण

बेंगळुरू, – रॅपिडो या भारतातील आघाडीच्या राइड शेयरिंग प्लॅटफॉर्मने सीरीज ई फंडिंगमध्ये २०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळवत भारतात शेयर्ड मोबिलिटी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या आपल्या प्रवासात ऐतिहासिक टप्पा रचला.

सीरीज ई फंडिंग राउंडमध्ये आघाडीवर असलेली वेस्टब्रिज कॅपिटल ही गुंतवणूक क्षेत्रातील प्रमुख कंपनी असून भारतात गुंतवणूक करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. या राउंडमध्ये सध्याचे गुंतवणूकदार नेक्सस आणि नवे गुंतवणूकदार थिंक इन्व्हेस्टमेंट्स आणि इनव्हस अपॉर्च्युनिटीजही सहभागी झाले होते. या गुंतवणुकीमुळे रॅपिडोचे मूल्यांकन १.१ अब्ज डॉलर्सवर गेले असून शहरी वाहतूक क्षेत्रातील कंपनीचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.

रॅपिडोचे सह- संस्थापक अरविंद सांका या फंडिंगविषयी म्हणाले, ‘या नव्या भांडवलासह आम्ही सुविधांचा विस्तार करत ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यावर भर देणार आहोत. गेल्या वर्षभरात आम्ही लक्षणीय विकास साधला असून दैनंदिन राइड्सची संख्या २.५ दशलक्षांवर गेली आहे. या गुंतवणुकीमुळे आमच्या सेवांमध्ये नाविन्य आणत त्या उंचावण्याची क्षमता कंपनीला मिळणार आहे. पर्यायाने ग्राहकांना आणखी चांगली सेवा देणे आणि प्रत्येकासाठी शहरी वाहतुकीचा लक्षणीय विकास करणे आम्हाला शक्य होणार आहे.’

वेस्टब्रिज कॅपिटलचे सह- संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुमीर चढ्ढा म्हणाले, आम्ही केलेल्या प्राथमिक गुंतवणुकीनंतर गेल्या पाच वर्षांत अरविंदपवनऋषीकेश आणि टीमने या संकल्पनेचे भारतातील कमी खर्चातील वाहतूक सेवा प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर करताना आम्ही पाहिले आहे. बाइक टॅक्सीचे वर्चस्व तयार करण्यापासून ३डब्ल्यू ऑटो व कॅब क्षेत्रात प्रगती करण्यापर्यंत त्यांनी केलेला विकासकामकाजातील त्यांचा उत्साह आणि ग्राहक व कॅप्टन समाधानावर असलेला सातत्यपूर्ण भर दिसून आला आहे. भांडवल प्रभावीपणे वापरून रॅपिडोला भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कन्झ्युमर इंटरनेट अपचे स्थान मिळवून दिल्याबद्दल आम्ही टीमचे अभिनंदन करतो. या नव्या फंडिंग राउंडमुळे त्यांच्या प्रवासाप्रती आमची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

नव्याने उभारण्यात आलेला निधी भारतात रॅपिडोचा धोरणात्मक विस्तार करण्यासाठी आणि तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढवत सेवा उंचावण्यासाठी वापरला जाईल. रॅपिडोने सर्व विभागांत आपले कामकाज विस्तारण्याचे ध्येय ठेवले असून त्यात बाइक टॅक्सीज, तीन चाकी आणि टॅक्सी कॅब यांचा समावेश असेल.

नऊ वर्षांपूर्वी स्थापना झाल्यापासून १५० टक्क्यांपेक्षा जास्त वार्षिक विकास साधत भारतातील कन्झ्युमर इंटरनेट क्षेत्राचे पुनरूज्जीवन करत शेयर्ड मोबिलिटी क्षेत्रात अग्रेसर स्थान मिळवले आहे. सुरुवातीला बाइक- टॅक्सीजवर भर देत कंपनीने नंतर ऑटो व कॅब सेवा क्षेत्रात विस्तार केला आणि आपले मूल्य तसेच कामकाज बळकट केले. रॅपिडोने प्रमुख शहरांपलीकडे आपली सेवा विस्तारत १०० पेक्षा जास्त शहरांत अस्तित्व निर्माण केले आहे. त्यात देशभरातील दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांचा समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांना अडवल्याने तणाव:चुनाभट्टी-सायन मार्गावर मोठा गोंधळ, अखेर पोलिसांनी नमते घेत रिक्षा सोडल्या

मुंबई- महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी...

बावधनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), विकास प्रतिष्ठान...

संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ: हर्षवर्धन सपकाळ.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीचे बंधन तोडून सामाजिक न्याय,...

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात रंगणार संशोधकांचा मेळा

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या हार्डवेअर अंतिम फेरीसाठीदेशभरातील २४ संघांचा सहभाग पुणे: एमआयटी...