पुणे :१- मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या चे झालेले नुकसान हे दुर्दैवी नक्कीच आहे परंतु देशाच्या पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितलेली असताना त्यावर त्यावर गलिच्छ राजकारण करून महाविकास आघाडी हे किती खालच्या स्तरावरील राजकारण करत आहे याचे उदाहरण आज आपल्याला बघायला मिळत आहे घटनेचे गांभीर्य ओळखून सरकारच्या बाजूने भूमिका घेण्याच्या ऐवजी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष हे गलिच्छ आणि महापुरुषांच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत कर्नाटक मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर बुलडोजर चालवला गेला त्यावेळी महाविकास आघाडी मूक गिळून बसली होती यावरून हे स्पष्ट आहे की यांना यांना फक्त राजकारण करण्यासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करायचा आहे असा घणाघात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री अनुप मोरे यांनी केला
आज राज्यभरात महायुतीच्या वतीने महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या घाणेरडा राजकारणाच्या विरोधात तीवव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. पुण्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे पुणे शहराचे अध्यक्ष धीरज घाटे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप तसेच पुणे शहर युवा मोर्चा शहराध्यक्ष करण मिसाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी अनुप मोरे बोलत होते शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे झालेली घटना नक्कीच दुर्दैवी आहे परंतु महाविकास आघाडीचे बगलबच्चे हे त्या अडून सुडाचे राजकारण करत आहेत महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे त्यामुळे जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही
आंदोलनानंतर डेक्कन वरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला हार घालून समारोप करण्यात आला
यावेळी पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी ,रवींद्र साळेगावकर, मित्र येरवडेकर ,नवनाथ पठारे सपना तावडे ,मनीषा धारणे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते