पुणे-भारतीय लष्कराच्या वानवडी येथील कमांड हाॅस्पिटल याठिकाणी मल्टी टास्क सर्व्हिस (एमटीएस) क्लर्क, काॅम्प्युटर आॅपरेटर, माळी, स्वीपर, शिपाई अशा विविध पदावर जागा भरावयाचे आहे. असे सांगून एका आराेपीने ४९ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घालत, नाेकरी लावून न दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनायक तुकाराम कडाळे (वय-५३,रा.मार्केटयार्ड,पुणे) या आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहकारनगर पाेलीस ठाण्यात राजेंद्र काशिनाथ हगवणे (वय-५३,रा.धनकवडी,पुणे) यांनी आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार नाेव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२३ दरम्यान घडला आहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी विनायक कडाळे याने तक्रारदार यांना कमांड हाॅस्पिटल वानवडी येथे वेगवेगळया पदावर जागा भरावयाचे असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी चांगल्या पगाराची नाेकरी मिळू शकते असे सांगून तक्रारदार यांची मुलगी , इतर नातेवाईक व काही मित्र यांचेकडून राजेंद्र हगवणे यांचे पत्नी सविता यांच्या बँक खात्यावर रक्कम गाेळा करण्यास सांगितली. तक्रारदार यांचे पत्नीचे खात्यावरुन अाराेपीने त्याचे इंडियन बँक, वानवडी शाखा या बँक खात्यावर ३० लाख ६० हजार रुपये घेऊन इतरांनी परस्पर आराेपीने सदर बँक खात्यावर १८ लाख ७५ हजार रुपये पाठवून असे मिळून एकूण ४९ लाख ३५ हजार रुपये आराेपीचे खात्यावर दिले. मात्र, त्यानंतर आराेपीने काेणालाही नाेकरी मिळवून न देता तसेच गुंतवणुक केलेले पैसे परत न करता सदर रकमेची फसवणुक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहकारनगर पाेलीस ठाण्याचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक एन पवार करत आहे.