ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन

Date:

पुणे- सलाम पुणे सह अनेक पुरस्काराने सन्मानित झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालं आहे. २७ ऑगस्ट रोजी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली अनेक दशकं या हरहुन्नरी अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी कलाविश्वात देखील सुहासिनी देशपांडे यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती.सुहासिनी देशपांडे २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम’ चित्रपटात झळकल्या होत्या. वयाच्या १२ व्या वर्षापासून त्यांनी कलाक्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. ‘माहेरचा आहेर’, ‘मानाचं कुंकू’ (१९८१), ‘कथा’ (१९८३), ‘आज झाले मुक्त मी’ (१९८६), ‘आईशप्पथ’ (२००६), ‘चिरंजीव’, ‘अग्निपरीक्षा’, ‘धग’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘बाईसाहेब’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय त्यांनी ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘लग्नाची बेडी’ अशा अनेक नाटकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे.रंगभूमीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना २०१५ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. गेल्या ७० वर्षांत १०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्रीच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर बुधवारी ( २८ ऑगस्ट) पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सलाम पुणे पुरस्कार समारंभात केली होती धमाल
सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित झालेले अभिनेते आणि अभिनेत्री (आमच्या संग्रहातील संस्मरणीय असे हे फोटो , राघवेंद्र कडकोळ , लीला गांधी , ज्योती चांदेकर , जयमाला इनामदार , सुहासिनी देशपांडे ,वसंतअवसरीकर ,जयवंत वाडकर ,स्वरूप कुमार ,भालचंद्र पानसे ,सदानंद चांदेकर, तत्कालीन सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे .. आणि सलाम पुणे)
















All reactions:
4Sanjay Lonkar, Vijay Hingane and 2 others

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत ‘एमआयटी एडीटी’च्या भाग्यश्री घुलेची सुवर्ण कमाई

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवड पुणे : आर्मी...

मिळकतकराच्या भल्या मोठ्या रकमेने ‘तो’ हादरला ? अन पिस्तूल काढून म्हटलं बास आता खेळ खलास झाला..!

पुणे महापालिकेच्या भवनातला प्रकार पुणे- शासकीय,निमशासकीय संस्था हल्ली सामान्य...

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, पुणे (दि. १३...

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत...