पुणे, दि. २१ ऑगस्ट २०२४:आकुर्डीमधील मोहननगर, काळभोरनगर, इंदिरानगर परिसरातविजेच्या आणखी सुरळीत व दर्जेदार पुरवठ्यासाठी महावितरणकडून सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून (आरडीएसएस) उच्चदाब वीजवाहिन्यांचे विभाजन, नवीन रोहित्र व अस्तित्वात असलेल्या रोहित्रांची क्षमतावाढ,लघुदाब वीजवाहिन्या बदलणे तसेच वीजसुरक्षेसाठी एरीअल बंच केबल टाकणे आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
यासोबतच जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून चिंचवड स्टेशन येथील ३१५ केव्हीएचे रोहित्र ६१५ केव्हीए क्षमतेचे करणे, मोहननगर व अष्टविनायक येथे प्रत्येकी २०० केव्हीएचे एक नवीन रोहित्र उभारणे आणि या भागातील जुन्या लघुदाब वीजवाहिन्या बदलण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत महावितरणने देखभाल व दुरुस्तीअंतर्गत रोहित्रापासून वीजग्राहकांच्या घरांपर्यंत लघुदाबाची १२० मीटर भूमिगत वाहिनी बदलली असून आणखी १२० मीटर बदलण्याचे काम सुरु आहे.
गेल्या २४ ते २५ जुलै दरम्यान आकुर्डी परिसरात अतिवृष्टी सदृष्य पाऊस झाल्याने वीजपुरवठ्यात अडथळे आले होते. यासोबतच महावितरणकडून आतापर्यंत १२५ ग्राहकांचा वीजपुरवठा वीजबिलांच्या सुमारे १० लाख रुपयांच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. तसेच अनधिकृत वीजवापरासाठी वापरलेले आकडे वेळोवेळी मोहीम राबवून काढून टाकण्यात आले आहे.