पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज झाशीची राणी पुतळा, बालगंधर्व चौक, पुणे येथे बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्र ही थोर संताची भूमी आहे आणि आज याच भूमीत आपल्या लाडक्या बहिणी व लहान मुली असुरक्षित आहेत. समाज तसेच राज्य सरकारने याबाबत सतर्कता बाळगण्याची गरज आहे. महिलांविरोधातील अत्याचारांच्या गुन्ह्यांची तातडीने चौकशी व्हायला हवी. तसेच अशा पध्दतीचे विकृत आणि क्रुर कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी. अशी कृत्ये करणाऱ्यांना कठोर शिक्षेची भीती असायलाच हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस बलात्कारी रांझ्या पटलाचा हात – पाय कापून त्याचा चौरंगा केला होता अशी शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी दिली होती अशीच शिक्षा आजच्या या विकृत नराधमांना दिली तरच आपल्या आया-बहिणी सुरक्षित राहतील.
बदलापूर येथील पिडीत कुटूंबियांनी पोलीसांकडे तक्रार दिली असताना पोलीसांनी FRI दाखल करायला दोन तास विलंब केला. शाळेच्या व्यवस्थापन समितीचे हे भाजपाचे पदाधिकारी असल्यामुळे पोलीसांनी FRI दाखल करायला दिरंगाई केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असताना अशा प्रकारच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत आहेत, याची नैतिक जबाबदारी त्यांनी घेऊन त्वरीत राजीनामा द्यावा. अशी मागीण या आंदोलनाद्वारे आम्ही करीत आहोत.’’यानंतर महाराष्ट्राचे माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे व माजी महापौर कमल व्यवहारे यांचीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या विरोधात निषेधाची भाषणे झाली.
यावेळी माजी शिक्षण मंडळ अध्यक्षा संगीता तिवारी, मनीष आनंद, मुख्तार शेख, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, सुजीत यादव, अक्षय माने, रमेश सानेकांबळे, अजीत जाधव, रमेश सकट, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, सेवादलाचे प्रकाश पवार, द. स. पोळेकर, संतोष आरडे, घनशाम निम्हण, सतिश पवार, संदिप मोकाटे, नुर शेख, रवि आरडे, आशितोष शिंदे, ॲड. राजश्री अडसुळ, सुंदर ओव्हाळ, शोभना पण्णीकर, छाया जाधव, नलिनी दोरगे, रजिया बल्लारी, सुनिता नेमुर, बेबी राऊत, हर्षद हांडे, विश्वास दिघे, लतेंद्र भिंगारे, डॉ. रमाकांत साठे, अशोक लोणार, महेश विचारे, कृष्णा नाकते आदींसह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.