आदर्श गुरुवर्य वस्ताद कै.पै.निवृत्ती दादा मारणे यांच्या जयंतीनिमित्त आयोजन ; तब्बल ११८ रक्तदात्यांचा सहभाग
पुणे : कुमठेकर रस्त्यावरील कुंजीर तालमीच्या आजी-माजी पैलवान व वस्ताद मंडळींच्या वतीने आदर्श गुरुवर्य वस्ताद कै.पै.निवृत्ती दादा मारणे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ११८ बाटल्या रक्त संकलीत झाले.
रक्तदान शिबिराला उपमहाराष्ट्र केसरी विशाल आप्पा कलाटे, राहुल देशमुख, प्रभाकर मोहोळ, शाम मारणे, महेश बराटे, रणजित गट, पांडाभाऊ खाणेकर, नितीन पायगुडे, गणेश कंधारे, गोरख वांजळे, प्रशांत टिंगरे, हेमंत माझिरे, पप्पू वांजळे, भीमराव वांजळे, तेजस वांजळे, वैभव दिघे, विरेंद्र गोगावले, सुरेश सपकाळ, श्रीकांत चोरगे डॉ. शैलेश गुजर, रामदास मारणे आदी उपस्थित होते.
शिबीराकरिता तालमीतील सर्व आजी माजी पैलवान व वस्ताद मंडळींची यावेळी उपस्थिती होती. रक्तदानामधे पैलवान, वस्ताद, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांसह दृष्टीहीन तरुणांनी देखील सहभाग घेतला. रक्तदान शिबीरासाठी ९७ वेळा रक्तदान करणारे सुरेश सकपाळ यांचे विशेष सहकार्य लाभले, ओम ब्लड बॅंकेने रक्त संकलन केले.