पुणे –
कोलकाता येथे एका डॉक्टरवर अनेक नराधमांनी मिळून केलेल्या अमानुष अत्याचारांचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात मुक आंदोलन करण्यात आले.
पुणे रेल्वे स्थानकाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एक तासाचे मुक आंदोलन करत कोलकाता येथील दुर्दैवी घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
“रघुपति राघव राजाराम सबको सन्मती दे भगवान” या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी दिलेल्या प्रार्थनेचे सामूहिक गायन यावेळी करण्यात आले.
कोलकाता येथील दुर्देवी घटनेचा तपास सीबीआयच्या ताब्यात देण्यात आला असून या घटनेची जलद गतीने चौकशी व्हावी व नराधमांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.
यावेळी प्रशांत जगताप, डॉ.सुनील जगताप, डॉ.शशिकांत कदम, चंद्रशेखर धावड़े, फ़ाईम शैख़, गणेश नलावडे, डॉ.गायकवाड़, डॉ.किशोर शाहाने, पूजा काटकर, राजश्री पाटिल, डॉ.निकिता गायकवाड़ आणि मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.